AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना बळींचे नाशिक महापालिका करणार ऑडिट, आयुक्तांनी का दिले आदेश?

नाशिक जिल्ह्यात सध्या 1 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 488 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बळींचे नाशिक महापालिका करणार ऑडिट, आयुक्तांनी का दिले आदेश?
Nashik Municipal Corporation
| Updated on: Feb 13, 2022 | 9:51 AM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) अजूनही कोरोनाचे (Corona) मृत्यू सुरू आहेत. ओमिक्रॉनमुळे (Omicron) रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णालये रिकामी आहेत. मात्र, होणारे मृत्यूही चिंताजनक आहेत. हे सारे पाहता आता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील मृतांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ऑडिटमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेक जण कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होतात. मात्र, त्यांना इतरही व्याधी असतात. त्यामुळे मृत्यू कोरोना आधीच्या व्याधीमुळे झाला की, कोरोनामुळे हे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर ते त्यावर योग्य तो निर्णय घेणार आहेत.

ऑडिटमध्ये ‘ती’ चौकशी होणार का?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, सरकारी रेकॉर्डनुसार कोरोना बळींची संख्या 4 हजार 33 आहे. मात्र, आता त्यात तब्बल 2800 बळींची भर पडली आहे. कारण सानुग्रह अनुदानासाठी मंजूर केलेल्या अर्जाची संख्या तब्बल 6800 वर गेली आहे. कोरोनाच्या सानुग्रह अनुदानासाटी एकूण 8 हजार अर्ज आले होते. त्यापैकी 1400 अर्ज फेटाळण्यात आले. तर 6800 अर्ज मदतीसाठी पात्र ठरले. त्यामुळे बळींची संख्या रेकॉर्डवर 2800 नी वाढली आहे. मात्र, कोरोना मृताची कसलिही आकडेवारी महापालिकेने लपवली नाही. सानुग्रह अनुदानाचे अर्ज वाढले आहेत. संबंधित व्यक्तींनी कागदपत्रे, पुरावे जोडली. अनेक जणांचे जिल्हाबाहेर मृत्यू आहेत. जे आहे ते समोर आहे, असा दावा महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केला होता. या ऑडिटमध्ये या प्रकरणाची काही चौकशी होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आतापर्यंत किती कोरोना मृत्यू?

नाशिक जिल्ह्यात 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी कोरोनामुळे अनुक्रमे 5- 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील 3 आणि नाशिक ग्रामीणमधील 2 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 63 हजार 252 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 488 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.