Nashik Nagar Panchayat Polling…आधीच उल्हास त्यात थंडीचा मास…6 नगरपंचायतींच्या मतदानाकडे नागरिकांची पाठ

नाशिकमध्ये सध्या थंडीची लाट सुरू आहे. उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासूनचे थंड वारे थेट नाशिकच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे निफाडचे तापमान चक्क 9.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

Nashik Nagar Panchayat Polling...आधीच उल्हास त्यात थंडीचा मास...6 नगरपंचायतींच्या मतदानाकडे नागरिकांची पाठ
Election
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 21, 2021 | 11:59 AM

नाशिकः जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या मतदानाची प्रक्रिया अतिशय शांत आणि थंड सुरू आहे. त्यातही नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट असल्यामुळे नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदानाकडे अक्षरशः पाठ फिरवली. दुपारच्या सत्रात हे मतदान वाढण्याची आशा आहे. निफाड नगरपंचायतीसाटी तर सकाळी साडेनऊपर्यंत सहा टक्केही मतदान झाले नव्हते. जिल्ह्यातील बहुशांत ठिकाणीही नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसले.

असा रंगलाय सामना

दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगला आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे. निफडमध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होतेय. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होत आहे.

निफाडमध्ये 5.84 टक्के मतदान

नाशिकमध्ये सध्या थंडीची लाट सुरू आहे. उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासूनचे थंड वारे थेट नाशिकच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे निफाडचे तापमान काल 8.5 अंश सेल्सिअस होते. आज ते 9.5 अशं सेल्सिअस आहे. त्यामुळे निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी सकाळीही शेकोट्या पेटवल्या जात आहेत. नाशिकमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या मतदानाकडे नागरिकांनी सकाळच्या सत्रात पाठ फिरवली. दंडोरी नगरपंचायतीसाठी सकाळी 9.30 पर्यंत 13 टक्के मतदान झाले, तर निफाड नगरपंचायतीसाठी सकाळी 9.30 पर्यंत अवघे 5.84 टक्के मतदान झाले.13709 मतदारांपैकी फक्त 800 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कळवमध्ये 10.62 टक्के, देवळा येथे 13.30 टक्के, निफाड येथे 5.84 टक्के, दिंडोरी येथे 13 टक्के, तर सुरगाणा येथे 14.3 मतदान झाले आहे.

निकाल 19 जानेवारी रोजी

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, दिंडोरी, कळवण तालुक्यातील 11 ओबीसी राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. त्यासाठी नव्याने 23 डिसेंबर रोजी महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. उमेदवारांना 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 10 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या जागांचे 18 जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल मात्र 19 जानेवारी रोजी लागेल.

इतर बातम्याः

Nashik Election| राडा टाळण्यासाठी विकेंद्रीकरणाचा रामबाण…महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बरंच काही घडतंय!

Nashik Omicron| कळते पण वळत नाही; दुसरा डोस फक्त 40 टक्के लोकांनीच घेतला, धास्ती प्रशासनाला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें