शेतकरी बाप लेकाची सोबत जळणार चिता, संपूर्ण गावात पसरली शोककळा, काय घडलं?

नाशिक जिल्ह्यातील एका घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. शेतकरीच्या संदर्भात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु वाहत आहे.

शेतकरी बाप लेकाची सोबत जळणार चिता, संपूर्ण गावात पसरली शोककळा, काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 5:48 PM

मालेगाव, नाशिक : नाशिकच्या मालेगाव येथील खडकी गावत एक हृदयद्रावक ( Sad News ) घटना घडली आहे. आधीच शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका सुरू असतांना आलेले हे संकट संपूर्ण गावाला रडायला भाग पडत आहे. यामध्ये शेतकरी बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका शेतकरी बाप लेकाला ( Farmer Death ) बसला आहे. शेतात कांद्याच्या पिकाला पाणी भरत असतांना महावितरणच्या तारेला मुलगा समाधान कळमकर हे विजेच्या तारेला लटकले त्याच वेळी त्यांना काय झालं म्हणून स्पर्ध करायला गेलेल्या वडिलांनाही शॉक लागला. दोघे विजेच्या तारेला तसेच राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच आहे. नांदगाव येथील एक शेतकरी अवकळी पाऊस सुरू झाल्याने शेतातील कांदे झाकण्यासाठी गेलेले असतांना त्यांच्यावर वीज पडली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना ताजी असतांनाच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील खडकी गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात पाणी भरत असतांना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये बाप लेकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.

हे सुद्धा वाचा

ज्या कांद्याला बाजारात भाव नाव त्या कांद्यासाठी जीवाचे रान करत असतांना बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. शेतकरी एकीकडे रात्रीची लाइट नको दिवसाची द्या म्हणून मागणी करत असतांना ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे शेतकरी महावितरणवर संताप व्यक्त करत आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले असतांना समोर आलेली ही हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. पिता पुत्राची एकाच वेळी चिता पेटवण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त केली जाता आहे.

पोटाच्या आगीसाठी दोघेही संघर्ष करत असतांना एकाच वेळी अग्नीवर जाण्याची वेळ शेतकरी पिता पुत्रावर आल्याने जिल्ह्यातीळ शेतकरी सुन्न झाला आहे. खडकी गाव संपूर्ण शोकसागरात बुडाले आहे. गावात फक्त रडण्याचा आवाज येत असून गाव सुन्न झाले आहे.

नुकतेच दोन्ही पिता पुत्राच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. खडकी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसल्याचा आरोप करत गावकरी कारवाईची मागणी करत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.