नाशिकनंतर ‘या’ शहरात आयकर विभागाचे छापे, छापेमारीसाठी पन्नासहून अधिकाऱ्यांचे पथक; रडारवर कोण?

| Updated on: Apr 20, 2023 | 3:28 PM

नाशिक शहरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्यानंतर आता इतर शहरांतही कारवाई सुरू केल्यानं खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.

नाशिकनंतर या शहरात आयकर विभागाचे छापे, छापेमारीसाठी पन्नासहून अधिकाऱ्यांचे पथक; रडारवर कोण?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : आज सकाळी सहा वाजेपासून नाशिकच्या विविध भागातील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यामध्ये महात्मा गांधी रोडसह शहरातील मुंबई नाका, कॉलेजरोड, गंगापुर रोड या भागात छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये नाशिक शहरात जवळपास पन्नासहून अधिक आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. त्यामध्ये नाशिकच्या पंधरा ते वीस कर चुकवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना रडारवर घेतले आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे सकाळी सहा वाजेच्या दरम्यानच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याने बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. त्यात सकाळपासून आत्तापर्यन्त ही चौकशी सुरू आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आयकर विभागाचे अधिकारी पोहचले असून इगतपुरी मध्येही छापेमारी करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील जवळपास पंधरा व्यावसायिकांना रडारवर घेतल्यानंतर शहारातील इतर बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यातच छापेमारी थेट ग्रामीण भागात पोहचली असून इगतपुरी मधील एका बड्या व्यासायिकाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे.

इगतपुरी येथील बालाजी ट्रेडिंग म्हणून असलेल्या एका फर्मवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सकाळी 7 वाजेपासून आयकर विभागाचे 7 ते आठ अधिकारी तपासणी करीत आहे. साधारण सहा तास उलटून गेले तरी चौकशी सुरू असल्याने इगतपुरीत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

खरंतर मार्च महिन्यात कर भरण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू असते. तर काही कर कसा चुकवता येईल यासाठी प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न नाशिक मधील बांधकाम व्यवसायिकांनी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत असतांना काही कागदपत्रे तपासणी सुरू केली आहे.

कागदपत्रांची पूर्तता करू न शकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना आयकर विभागाने रडारवर घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या छापेमारी कोणी दोषी आढळून येते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

नाशिकच्या इगतपुरी शहरातही कारवाई झाल्याने ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक तासंतास चौकशी करत असल्याने बांधकाम व्यासायिकांच्या वर्तुळात भीती निर्माण झाल्याने अनेकांनी कार्यालय बंद करून धूम ठोकली आहे.

अनेक बांधकाम व्यवसायिकांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. तर अनेक जण भीती पोटी कार्यालयातच आलेले नाही. तआयकर विभागाची कारवाई सुरू असल्याचे ऐकून खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.