.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, नेत्यांची नाव घेऊन सांगितली ‘मन की बात’

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे. याशिवाय त्यांनी निवडणुकीत कोणती भूमिका बजावणार आहे याबाबत भाष्य केले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, नेत्यांची नाव घेऊन सांगितली 'मन की बात'
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: May 06, 2023 | 3:36 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून खासदार शरद पवार ही चर्चेत आहे.  त्याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार हेच अध्यक्ष असावेत अशी मागणी करत आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्याच दरम्यान अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षस्थानी असणे गरजेचे असल्याचे सांगत राज्यसह देशाला शरद पवार यांची गरज असल्याचे बोलून दाखवलं होतं. त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट निर्माण करण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्येच असल्याचं अनेक नेत्यांनी बोलून दाखवलं होतं.

त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षस्थानी असणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं, यावेळी बोलतांना लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षस्थानी असणं गरजेचं असल्याचं सांगत शरद पवार हेच विरोधकांना एकत्रित आणण्याची जबाबदारी पार पाडू शकतात त्यांच्या सारखा दुसरा कुठलाही नेता नाही असं संजय राऊत म्हणाले होते.

शरद पवार हेच देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रित करू शकतात असं बोललं जाऊ लागलं होतं. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील बहुतांश नेत्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली होती. त्याबाबत स्वतः शरद पवार यांनीही माहिती दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलत असतांना शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे.

शरद पवार यांनी विरोधकांची एकजूट करणं गरजेचं असल्याचं सांगत त्यामध्ये अनेक नेते एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत, नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांची नावे घेत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून विरोधकांना एकत्रित आणण्यासाठीचा माझा सहभाग असेल असं शरद पवार म्हणाले आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका बजावणार आहेत याबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. एकूणच नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, के चंद्रशेखरराव,  ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रित करून भाजपच्या विरोधातील लढाई अधिक बळकट करण्यासाठी शरद पवार हे महत्त्वाची भूमिका बजावणार हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर