शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत ‘या’ दोन नेत्यांना माहिती होतं; छगन भुजबळ यांनी पडद्या मागची गोष्ट सांगितली

Chhagan Bhujbal on Sharad Pawar resignation : शरद पवार राजीनामा देणार असल्याचं कुणाला माहिती होतं? छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत 'या' दोन नेत्यांना माहिती होतं; छगन भुजबळ यांनी पडद्या मागची गोष्ट सांगितली
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 1:26 PM

नाशिक : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदवरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. कारण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनाही याबद्दल कल्पना नसल्याचं प्रथमदर्शनी दिसलं. मात्र या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना कल्पना होती, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितली.

‘या’ दोन नेत्यांना कल्पना होती

शरद पवार यांच्या राजीनाम्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलंय. ” शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना या राजीनाम्याची कल्पना होती”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अर्धवट सोडून मी कोर्टात गेलो. तिथे मला कळालं की पवारसाहेबांनी राजीनामा दिला आहे आणि मला धक्काच बसला, असं भुजबळ यांनी सांगितली.

पवारसाहेबांनी कमिटी गठीत केली. पण मी आधीच सांगितलं की कमिटी मला मान्य नाही. कुटुंबातील नेत्यांना या निर्णयाची माहिती होती, असं भुजबळ म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सध्या काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. त्यावर छगन भुजबळ म्हणाले. उष्णतामुळे वज्रमूठ सभा तहकूब केल्या आहेत. रद्द केलेल्या नाहीत. सातत्याने सभा घ्यायचा का हा विचार ही पुढे आला. त्यामुळे तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येईल म्हटले पण ज्या खुर्चीवर पाहिजे त्या खुर्चीवर आले नाहीत, असा टोलाही छगन भुजबळ म्हणालेत.

उद्योग येत नाही, अशी ओरड वारंवार होते. त्यामुळे जायला पाहिजे, लोकांची भावना समजून घेतली पाहिजे. उद्योग आले पाहिजे, पण त्याचा पर्यावरणला किती धोका आहे हे पण तपासलं पाहिजे. प्रकल्प जबरदस्तीने लादण्याची गरज नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी बारसूतील रिफायनरी विरोधातील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.