AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ यांनी सांगितला जेलमधील किस्सा, जेलमध्ये असतांना मी अनेक…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन अडीच वर्षे जेलमध्ये असतांना एक सवय लागली होती. ती सवय त्यांनी जाहीर व्यासपीठावर सांगितली आहे. भुजबळ यांना ईडीने अटक केली होती त्यावेळेचा प्रसंग सांगितला आहे.

छगन भुजबळ यांनी सांगितला जेलमधील किस्सा, जेलमध्ये असतांना मी अनेक...
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: May 06, 2023 | 1:49 PM
Share

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास अडीच वर्षे छगन भुजबळ हे ईडीच्या तुरुंगात होते. त्याच दरम्यान छगन भुजबळ यांनी काय केले होते. त्यावेळी त्यांना कसली सवय लागली होती असे त्यांनी स्वतःच जाहीर कार्यक्रमात सांगून टाकले आहे. छगन भुजबळ यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. त्यावेळी छगन भुजबळ यांनी मला पुस्तक वाचण्याची सवय लागली ती जेलमध्ये असतांना. अनेक पुस्तक वाचली त्यामुळे जेलचे वातावरण कळले नाही. आम्ही जेलच्या वातावरणात देखील पुस्तकांमुळे पोहून आलो असे छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थित नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलत असतांना प्रभु रामचंद्र सारखी नाशिक भूमी प्रसिद्ध तशी लेखकांसाठी देखील ही भूमी महत्वाची आणि प्रसिद्ध भूमी असून साहित्याची फारमोठी परंपरा आहे असल्याचे म्हंटले आहे.

तीन वेळा नाशिकला साहित्य संमेलन झाले. नाशिकला साहित्यप्रेमी आहेत. त्यामुळे प्रकाशन संमेलन असे अनेक कार्यक्रम होतात. राजकिय लोकांपेक्षा इकडे जास्त गडबड असते अशी मिश्किलपणे भुजबळ यांनी म्हणत आमच्या गडबडीतून तुम्हाला लिहायला मिळते , छापायल मिळते असे म्हंटलं आहे.

आता चार दिवसांच्या घडामोडींवर एखादे पुस्तक आले तर नवल नको वाटायला. लेखकांनी पुस्तक लिहिली नसती प्रकाशकांनी छापली नसती तर काय समजल असत ? असा सवाल उपस्थित करत साहित्यिकांच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यामध्ये छगन भुजबळ यांनी अनेक जुन्या नेत्यांचंही यावेळला उदाहरण दिले.

यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या राजकीय नेत्याने पुस्तके लिहीली. पंडित नेहरू यांच्यावर टीका झाली परंतु अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहे. मी देखील दोन अडीच वर्ष जेल मध्ये राहिलो त्यावेळी अनेक पुस्तके वाचायची सवय झाली. जेलच्या वातावरणात देखील पुस्तकांमुळे पोहून आलो असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

जेल मध्ये अनेक पुस्तके वाचली, महत्त्वाची भुमिका पुस्तके निभावत असतात. लेखकांना देखील प्रोत्साहान मिळाले पाहिजे. लिखाणामुळे अनेक गोष्टी लक्षात राहतात. अडचणी नसेल तर राज्यकर्ते देखील अनेक अडचणी वाढवतात टॅक्स असेल किंवा इतर बाबी. एकूणच छगन भुजबळ यांनी राज्य कर्त्यांवर निशाणा साधला आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.