AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नाशिक जिल्हा , कायद्याचा बालेकिल्ला’, व्हायरल ट्रेंडवरून वादाला फुटलं तोंड ?

नाशिक पोलिसांचा 'कायदा बालेकिल्ला' घोषवाक्यासह आरोपींना सार्वजनिकरीत्या फिरवण्याचा ट्रेंड राज्यात पसरला आहे. ठाणे, अकोल्यातही असेच प्रकार दिसत आहेत, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत सूचना नाही. ही पद्धत कायद्याचे उल्लंघन आहे की त्वरित न्याय, यावर कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांचे दावे आणि कायदेतज्ञांची मते यात संघर्ष दिसून येतो.

'नाशिक जिल्हा , कायद्याचा बालेकिल्ला', व्हायरल ट्रेंडवरून वादाला फुटलं तोंड ?
गुन्हेगारांच्या वॉक ऑफ शेमचा ट्रेंडImage Credit source: social media
| Updated on: Apr 02, 2026 | 11:19 AM
Share

गेल्या काही काळापासून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर एक दृश्य वारंवार दिसू लागलं आहे. एखादा आरोपी बाहेर आणला जातो- तो कधी लंगडत असतो, तर कधी दोन्ही बाजूंनी पोलिसांच्या आधाराने उभा इसतो, तशा अवस्थेतच त्याला कॅमेऱ्यासमोर उभं केलं जातं. “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला.” अशी घोषणा त्याच्या तोंडून वदवून घेतली जाते. गेल्या सहा महिन्यांत असं अनेक वेळा घडलं असून आता य व्हिडीओचं लोण फक्त नाशिकपरुतं मर्यादित राहिलं नसून राज्यातील इतर भागांतही दिसू लागलं आहे.

ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेरही अशाच परिस्थितीत आरोपींचे चित्रीकरण करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूंना पोलिस असताना, गुंडगिरीचे उदात्तीकरण (glorification) करणारे रील्स बनवल्याबद्दल आरोपी कॅमेऱ्यासमोर माफी मागताना दिसतात. मात्र तिथे फक्त घोषवाक्य बदललं आणि ते झालं: “ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला”, असं. अकोल्यातही स्थानिक पोलिसांनी याच प्रकारातील “before-and-after” रील्स अपलोड करणं सुरू केलं.

अशा रील्समध्ये सहभागी असलेल्या विरोधांत आम्ही यापूर्वीही कारवाई करायचो, त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घ्यायचो. मात्र आता समोर येणारा हा व्हिडीओ आणि (कायद्याचा) ‘बालेकिल्ला’चा या घोषणेचा संदर्भ आम्ही नाशिक पोलिसांकडून घेतला, असं मुंब्रा येथील एका अधिकाऱ्याने नमूद केलं.

असं असलं तरीही अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करण्यासाठी कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत आणि अशा कृतींना प्रोत्साहन दिले जात नाही असं महाराष्ट्राचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

नाशिकमधूनच सुरू झाला ट्रेंड

गुन्हेगारांच्या तोंडून कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेण्याचा हा ट्रेंड नाशिकपासून सुरू झाल्याचं नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लपवलेलं नाही. मात्र हे वाक्य खरंतर स्वतः आरोपींकडूनच आलं, असंही त्यांनी सांगितलं. त्याचं कारण म्हणजे, सुरुवातीला काही व्हिडीओ व्हायरल झाले, त्यामध्ये काही तरुणांनी नाशिकला “गुन्ह्यांचा बालेकिल्ला” असं घोषित केलं होतं. सोशल मीडियावर वाऱ्यच्या वेगाने झालेल्या या रील, व्हिडीओनंतर पोलिसांनी त्या तरूणांचा शोध घेत, त्यांचचं वाक्य फिरवून त्याला नवा अर्थ दिला. “आम्हाला हे घोषवाक्य इथूनच मिळालं. त्यानंतर अशा गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असं म्हणवून घेतलं जातं. हे शहर कायदा व सुव्यवस्थेचा बालेकिल्ला आहे,” असे कर्णिक यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

‘वॉक ऑफ शेम’मध्ये कोण कोणाची निघाली परेड ?

नाशिकमध्ये या ‘वॉक ऑफ शेम’ (walk of shame) द्वारे ज्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले, त्यात अनेकांच्या नावाचा समावेश आहे. रस्त्यावरच्या कथित गुन्हेगारांपासून ते ऑनलाईन माध्यमातून गुन्ह्यांचं उदात्तीकरण करणाऱ्या तरुणांपर्यंत, एवढंच नव्हे तर राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींचाही त्यात समावेश आहे. माजी नगरसेवक आणि RPI नेते प्रकाश लोंढे व त्यांचे पुत्र, भाजपचे पदाधिकारी मामा राजवाडे यांचं नाव त्यात होतं. नाशिकचा भोंदू बाबा, कथित कॅप्टन, महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरो असलेला अशोक खरात याच्यावर यालाही पोलिसांनी दट्ट्या दाखवला होता,’ नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असं खरात म्हणत असतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झालेला होता.

हे तर न्यायप्रक्रियेचे उल्लंघन 

खरंतर हे अनेक रहिवासी आणि पोलिसांच्या दृष्टीने, जलद आणि आदर्श न्यायाचे उदाहरण मानले जाते. मात्र हा तर सार्वजनिक अपमान असून न्यायप्रक्रियेचे उल्लंघन आहे असं टीकाकाराचं मत आहे. पण फारच कमी व्हिडिओ नाशिक पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर दिसतात, त्यापैकी अनेक व्हिडीओ स्थानिक न्यूज चॅनेल्स आणि पर्सनल अकाऊंट्सवरून प्रसारित झाले आहेत.

द इंडियन एक्सप्रेसने 50 हून अधिक अशा व्हिडिओंचे विश्लेषण केले असता असे आढळले की, यापैकी फारच कमी व्हिडिओ नाशिक पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर (ज्याचे सुमारे 70,000 फॉलोअर्स आहेत) दिसतात, तर अनेक व्हिडिओ स्थानिक न्यूज चॅनेल्स आणि खाजगी खात्यांद्वारे प्रसारित झाले आहेत. या क्लिप्समध्ये बहुतेक वेळा आरोपी गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर असून ते अस्वस्थ दिसले. काही व्हिडीओंमध्ये ते उकिडवे बसलेले, कान पकडून माफी मागताना आणि कायद्याचा बालेकिल्ला हे घोषवाक्य वारंवार म्हणताना दिसले होते. अनेक व्हिडिओ “before-and-after” या स्वरूपात तयार केले होते, ज्यामध्ये पहिल्या भागात त्या तरूणांचा कथित गुन्हा रीलच्या रूपात दाखवला, तर दुसऱ्या भागात आरोपीला अटक झाल्यानंतर माफी मागताना आणि नाशिकला “कायद्याचा बालेकिल्ला” म्हणताना दिसले.

पोलिसांकडून हेल्पलाइन सुरू

इतर ठिकाणांप्रमाणेच, नाशिकमध्येही सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असून अनेक तरुण गुन्हेगारीचं glorification, उदात्तीकरण करणारे रील्स पोस्ट करताना दिसतात. हा कल रोखण्यासाठी, पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पोलिसांनी कारवाई सुरू केली. तसेच आक्षेपार्ह मजकूर किंवा समाजविघातक कृत्यांची तक्रार करावी यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी पोलिसांनी एक हेल्पलाइन देखील सुरू केली आहे.

सुरुवातीला महिलांविरोधाती छळ आणि स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या उपक्रमाचे कौतुक झाले होते, मात्र नंतर याबद्दल वाद निर्माण झाला. काही प्रकरणांमध्ये आरोपींना कॅमेऱ्यासमोर मारहाण केल्याचे आणि सार्वजनिकरीत्या फिरवण्यात आल्याचे आरोप झाले असून त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

अनेक प्रकरणांमध्ये माध्यमांना या तथाकथित walk of shame चे शूटिंग करण्यासाठी बोलावण्यात आलं. त्यामध्ये आरोपींना लंगडत चालताना, घोषवाक्य म्हणण्यास भाग पाडले जाताना दिसतं, आणि नंतर अनेकांनी कोठडीत मारहाण झाली, असा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात कायदेशीर प्रश्नही उपस्थित झाले. खरंतर कायद्यानुसार, पोलिसांना शारीरिक बळाचा वापर करण्याची परवानगी नाही, आणि न्यायालयात हजर केल्यावर न्यायाधीश आरोपींना कोठडीत मारहाणीबाबत काही तक्रार आहे का, हे विचारतात. अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या आरोपींची परेड करणे हे न्यायप्रक्रियेचे उल्लंघन ठरू शकते असं मत कायदे तज्ज्ञांनी मांडलं. मात्र नाशिक पोलिस अधिकाऱ्यांनी हिंसाचाराचे आरोप फेटाळले आहेत.

Follow Us
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?