AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC परीक्षेला विद्यार्थ्यांना जाण्यास उशीर, नाशिकमधील खड्ड्यांचा फटका विद्यार्थ्यांना, परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ

खड्ड्यांमुळे UPSC परीक्षेला विद्यार्थ्यांना जाण्यास उशीर झाला, त्यामुळे त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला. यावरून परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला.

UPSC परीक्षेला विद्यार्थ्यांना जाण्यास उशीर, नाशिकमधील खड्ड्यांचा फटका विद्यार्थ्यांना, परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ
Image Credit source: upsc nashik centre
| Updated on: Sep 13, 2026 | 12:05 PM
Share

नाशिकमधील खड्ड्यांचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. नाशिकमधील खड्ड्यांमुळे UPSC विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. अवघ्या दोन मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांचा परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील खड्ड्यांमुळे केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला.

नेमकं काय घडलं?

UPSC परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास 2 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्यांना केंदावर प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी विनंती केली.परंतु त्यांना प्रवेश दिला नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. त्यात ऑनलाइन मॅपवर केंद्रावर पोहोचण्यासाठी चुकीचे मार्ग दाखवण्यात आले,असे कारण विद्यार्थ्यांनी दिले. इतर परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. परंतु एकाच केंद्रावर अडवणूक होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र विनंती केल्यानंतरही प्रवेश देण्यात आला नाही.

काय आहे नियम?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांना जाण्यास थोडाही उशीर झाल्यास त्यांना प्रवेश नाकारला जातो. याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अंत्यंत कडक नियम आहेत. तसेच प्रवेशाबाबतचे हे नियमच अंतिम आहेत. दरवर्षी अनेक परीक्षा केंद्रावर 1 ते 5 मिनिटांचा उशीर झाल्यास उमेदवारांना बसू दिले जात नाही. यामुळे उमेदवाराचे संपूर्ण वर्ष वाया जाते. खरंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमानुसार, परीक्षा सुरू होण्याआधी सुरक्षा तपासणी आणि बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे गेट बंद करण्याची वेळी काटेकोरपणे पाळली जाते. याच कडक नियमाचा फटका नाशिकमधील विद्यार्थ्यांना बसला.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा