नारायणी नमोस्तुते! सप्तश्रृंगी गडावर रोज 28 हजार भाविकांना मिळणार दर्शन; जाणून घ्या नियम अन् कुठे मिळेल पास?

भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगीगडावर रोज 28 हजार भाविकांना दर्शन देवीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नारायणी नमोस्तुते! सप्तश्रृंगी गडावर रोज 28 हजार भाविकांना मिळणार दर्शन; जाणून घ्या नियम अन् कुठे मिळेल पास?
सप्तश्रृंगीगड, वणी.
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 10:31 AM

नाशिकः भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगीगडावर रोज 28 हजार भाविकांना दर्शन देवीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नवरात्रोत्सवाने नाशिक जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. आजपासून मंदिरे खुले होत आहेत. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता अनेकांनी खबरदारी घेणे सुरू केले आहे. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या चांदवड येथील यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. सोबतच सप्तश्रृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी लसीचे दोन डोस आणि ऑनलाइन पास बंधनकारक करण्यात आला आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरविण्यास बंदी असेल आणि गडावर खासगी वाहनांनाही परवानगी आहे. नांदुरीवरून जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

असे आहेत नियम

नवरात्रोत्सवाच्या काळात तसेच कोजागरी पौर्णिमेलाही 18 आणि 19 ऑक्टोबरला खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये पन्नास टक्के प्रवासी बसवून वाहतूक सुरू राहील. नांदुरी येथील बुथवरून ऑनलाइन पास शक्य असेल तरच मिळेल. पायी दर्शन करण्यासाठी बारा ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडच्या नियमानुसार या काळात फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहणार आहे. त्यात फेनिक्यूलरमधील भाविकांना 30 टक्के तर पायरीचे दर्शन घेणाऱ्यांना भाविकांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.

कोरोनाचे नियम पाळणार

नवरात्रोत्सवाच्या काळात वणीच्या गडावर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे ध्यानात घेता कोरोनाचे नियम कडक पाळले जाणार आहेत. सुरक्षित अंतर ठेवणे, प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. यात हयगय केल्यास प्रशासनाने कारवाईचा इशाराही दिला आहे. विशेषतः भाविकांनी बसचा वापर करावा. जास्त गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

म्हणून खरबदारी घेणे सुरू

नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. सिन्नर आणि निफाड तालुक्यामध्ये रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. एकीकडे सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना शून्यावर जायला तयार नाही. कोरोना नियमांचे पालन सध्या कुठेही होताना दिसत नाही. मोठेमोठे खासगी कार्यक्रम जिल्ह्यात होताना दिसतायत. एखाद्या कार्यक्रमाला जेवणावळीसाठी फक्त शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी असेल, तर नागरिक दुपारी बारापर्यंत शंभर आणि सायंकाळी शंभर जणांना बोलवातयत. प्रत्येक नियमाला काही ना काही पळवाट आहे. अनेक जण मास्क घालत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या काही केल्या कमी व्हायला तयार नाही. हे पाहता नवरात्रोत्सवात कडक खबरदारी घेणे सुरू आहे.

इतर बातम्याः

वीजेच्या तांडवात शेतकरी ठार, माय-लेकीसह पाच जण बेशुद्ध; नाशिक जिल्ह्यात 10 शेळ्यांचाही मृत्यू

आमचा राम राम घ्यावा, मान्सून परतीच्या प्रवासावर; उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Non Stop LIVE Update
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.