गडकरी साहेब आम्ही नशिबवान, तुमची वाट पहात असतो, मंत्री भारती पवारांच्या भाषणानं नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या

| Updated on: Oct 03, 2021 | 11:12 PM

"तुम्ही येणार म्हणजे काही तरी देऊन जाणार. इथल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याला काय हवं आहे याचा तुम्ही विचार करता. गडकरी साहेब आम्ही तुमच्या येण्याची वाट बघत असतो, अशी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

गडकरी साहेब आम्ही नशिबवान, तुमची वाट पहात असतो, मंत्री भारती पवारांच्या भाषणानं नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या
Follow us on

नाशिक : “तुम्ही येणार म्हणजे काही तरी देऊन जाणार. इथल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याला काय हवं आहे याचा तुम्ही विचार करता. गडकरी साहेब आम्ही तुमच्या येण्याची वाट बघत असतो,” अशी शब्दात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. गडकरी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचेच उदाहरण म्हणून पवार यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. त्या नाशिकमध्ये पंचवटी भागातील पंडित दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होत्या.

तुम्ही येणार म्हणजे काही तरी देऊन जाणार

नाशिकमध्ये आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पंचवटी भागातील पंडित दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी नितीन गडकरी यांचे स्वागत केले. तसेच गडकरी यांचे कौतुकही केले. “गडकरी साहेब आम्ही तुमच्या येण्याची वाट बघत असतो. त्यामागे आमचा स्वार्थ असतो. अधिकाराणे आमचा पालक म्हणून गडकरी साहेब तुम्ही आहात. आम्ही नशीबवान आहोत. तुम्ही येणार म्हणजे काही तरी देऊन जाणार. इथल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याला कशाची गरज आहे या सर्वांचा तुम्ही विचार करता,” असे भरती पवार म्हणाल्या. पवार यांच्या या भाष्यानंतर नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तसेच याच कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनीदेखील नाशिक शहराची मोठी स्तुती केली आहे.

नाशिकसारख्या अभ्यासिका भारतात कुठेही नाहीत

या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी नाशिकचे कौतुक केले. येथील हवामान तसेच गोदावरीबद्दल ते भरभरून बोलले. नाशिकमध्ये दोन गोष्टी मला खूप आवडल्या. नाशिक सारख्या अभ्यासिका भारतात कुठेही नाहीत. इथले हवामान आमच्या नागपुरमध्येही नाही. येथील कार्यालये, त्यांना असलेली पार्किंग अतिशय उत्तम आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे नितीन गडकरी म्हणाले.

गोदावरी सुंदर, हवामान मस्त आहे

तसेच नाशिक शहराबद्दल बोलताना आपल्या पत्तीसोबत झालेला संवाददेखील गडकरी यांनी यावेळी सांगितला. माझी पत्नी विमानात माझ्यासोबत होती. नाशिकची शेती किती सुंदर आहे. गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे, असं ती मला सांगत होती, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच नाशिक शहराचा विकास आणि हवामान याबद्दल बोलताना त्यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांनी शहराचा अभ्यास करावा. शहराला सुंदर ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न करावा, असा सल्लादेखील दिला.

इतर बातम्या :

बच्चन मला म्हणाले, तुम्ही तरुण दिसता, मग गडकरींनी काय उत्तर दिलं? वाचा

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, लंके कुटुंब भारावलं; आमदार महोदयांच्या भावना काय

(bharati pawar appreciated nitin gadkari said gadkari will announce different schemes for nashik)