Chhagan Bhujbal: शरद पवार NDA मध्ये जाणार? छगन भुजबळ यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, दिले असे उत्तर…
Chhagan Bhujbal on Sharad Pawar: राष्ट्रवादीचे विलिनीकरण असो वा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी सहभागी होणे असो यावरून सध्या मोठी राजकीय खलबतं सुरू आहेत. दावे-प्रतिदावे सुरू आहेत. याविषयीवर मंत्री छगन भुजबळ यांनी असे उत्तर दिले आहे.

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होतील का? यासह राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोरदार खलबतं सुरू आहेत. गेल्या महिनाभरापासून या दोन्ही मुद्यांवर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. दावे-प्रतिदिवे सुरू आहेत. याविषयी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठे भाष्य केले आहे. त्यांनी याविषयावर थेट भूमिका मांडली आहे.
शरद पवार राष्ट्रवादीसोबत जातील?
दोन्ही राष्ट्रवादीचे रवंथ गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाही या मुद्दावर जोरदार चर्चा रंगल्या. त्यावर बोलताना या चर्चा वारंवार मीडियातून समोर येत असल्याचे भुजबळ म्हणाले. पण मला स्वतःला तसे वाटत नाही, असे स्पष्ट मत भुजबळांनी मांडले. तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत, NDA जातील का? याप्रश्नावर ते एनडीएत जाणार नाहीत, असे मोठे वक्तव्य भुजबळ यांनी केले आणि अनेक अटकळींवर पडदा टाकला.
एखाद्या विषयाला योग्य वाटलं तर मदत करू शकतात, असे सुतोवाच करून भुजबळांनी आगामी हिवाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि मतदान पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळू शकतो, असे मोठे संकेत दिले. निर्णय घेत नाही तोपर्यंत फक्त चर्चा सुरू असतात. डिलिमिटेशनचा विषय योग्य असेल तर ते मदत करतील, असे सांगायला भुजबळ विसरले नाहीत. तर शरद पवार यांच्या निवृत्तीवर त्यांनी तुम्हाला वाटत असेल तर त्यांना कळवा, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली.
समता पुरस्कार सोहळा पुण्यात
२८ नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्ताने फुले वाड्यात सभा होते. यामध्ये सामाजिक काम करणारे लोकं असतात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना समता पुरस्कार दिला जातो. शरद यादव, केतकर, पवार साहेबांना दिला आहे. लेखक आणि कवी नावाजलेले जावेद अख्तर यांना देणार आहेत. कार्यक्रमाला ते येणार आहेत, असे पवार म्हणाले.
दुष्काळी तालुक्यात वाढ होत आहे. नाशिकच्या काही तालुक्यांची अतिशय वाईट स्थिती आहे. नाशिकहून काही प्रस्ताव पाठवले आहे. दुष्काळाचा भाग वाढत चालला आहे. प्यायचे पाणी राखून ठेवावे लागेल. अन्य धान्य हा दुसरा विषय ते कुठूनही आणू दुष्काळी तालुक्यातील गरिबांना अन्नधान्य मोफत देणार आहेत. केसरी कार्ड आहे त्यांनाही मोफत धान्य देणार आहे. तो उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. मुख्यमंत्री त्याबाबत जाहीर करतील. जनावरे पाणी आणि चारा हा तिसरा मुद्दा आहे. जनावरे वाचली पाहिजे, दुष्काळ समिती त्याबद्दल निर्णय घेईल. वन विभागाच्या जमिनीवर चारा निर्माण करावा. चारा सरकार खरेदी करणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्रातील कामे करावी. पाण्याची पातळी खाली गेली आहे. आदेश निघाले आहेत जास्तीतजास्त कामे करावी. पाणी आडविण्याचे काम करावे, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.