AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना रूग्णांना गृहविलगीकरणास परवानगी न देता थेट रूग्णालयात दाखल करावे : छगन भुजबळ

कोरोना रुग्णांना गृहविलीगिकरणास परवानगी न देता थेट रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना छगन भूजबळ यांनी दिल्या.

कोरोना रूग्णांना गृहविलगीकरणास परवानगी न देता थेट रूग्णालयात दाखल करावे : छगन भुजबळ
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 30, 2021 | 5:07 PM
Share

नाशिक : कोरोना रुग्णांना गृहविलीगिकरणास परवानगी न देता थेट रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 जुलै) येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “ऑक्सिजन प्लँट त्वरित कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.”

“खतांचा पुरवठा वेळेवर करा”

“खतांच्या वाटपाबाबत शेतकऱ्यांना दैनंदिन माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच खतांचा साठा मुबलक प्रमाणात असून शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे,” असे यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

“अपघातग्रस्तांना मदतीचे वाटप”

येवला तालुक्यात वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदतीचे वाटप यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धनादेशाद्वारे  करण्यात आले.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या अंत्यविधी व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणाऱ्या निफाड तालुक्यातील युवकांचा सन्मान करून त्यांचे यावेळी भुजबळ यांनी अभिनंदन केले.

यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, उपअभियंता उमेश देशमुख, गटविकास अधिकारी संदीप कराड, उन्मेष देशमुख,  कृषिविकास अधिकारी रमेश शिंदे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

ओबीसींनी आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढा : छगन भुजबळ

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना 10-10 किलो गहू तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ देणार, छगन भुजबळ यांची माहिती

आधी भुजबळ फडणवीस भेटले, नंतर पवार मोदी भेटले, भेटीगाठीनं शिवसेना चेकमेट?

व्हिडीओ पाहा :

Chhagan Bhujbal say admit corona patient in hospital instead of Home isolation

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत