अतिवृष्टी, पूरग्रस्तांना 10-10 किलो गहू तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ देणार, छगन भुजबळ यांची माहिती

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू,10 किलो तांदूळ,5 लिटर केरोसीन,5 किलो डाळ पुरवण्याचे आदेश दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना 10-10 किलो गहू तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ देणार, छगन भुजबळ यांची माहिती
छगन भुजबळ

नाशिक: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू,10 किलो तांदूळ,5 लिटर केरोसीन,5 किलो डाळ पुरवण्याचे आदेश दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. तर, दुसरीकडे शिवभोजन थाळ्यांची संख्या दुप्पट करण्याचे आदेश दिल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. तर, पूर ग्रस्त जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि दरड कोसळल्यानं मोठा फटका बसला आहे.

पूरग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू,10 किलो तांदूळ,5 लिटर केरोसीन,5 किलो डाळ देण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ज्या नागरिकांनी गहू नको त्यांना तांदूळ देणार असल्याचंही भुजबळ म्हणाले . 5 किलो डाळ देखील देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं असून यासंदर्भातील आदेश जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांन सांगितलं.

शिवभोजन थाळ्यांची संख्या दुप्पट वाटप करावी असे आदेश दिल्याचही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहेत. अशा ठिकाणी शेजारील केंद्रावरून जेवणाचे पॅकेट्स पोहोचवण्याचे आदेश देण्यात आल्याचही भुजबळ यांनी सांगितलं.

महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे महासंकट

महाराष्ट्रावर सातत्यानं संकट येत आहेत त्यामध्ये अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. राज्यातील अनेक जिल्हे संकटात सापडले आहेत. अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सुनील तटकरे,उदय सामंत यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. पूराचं प्रमाण कमी झाल्यानं मदत कार्याला आता वेग येईल.नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करतो. घरातील सामान, अन्नधान्य वाहून गेले असून जो पर्यंत काही व्यवस्था होत नाही, तो पर्यंत मदत पुरवणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

साहित्य संमेलन तूर्तास होणार नाही

नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य समेंलन घेण्यात येणार आहे. मात्र,तूर्तास साहित्य समंलेन होणार नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले. तर, साहित्य संमेलनाला शक्य ती मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या:

VIDEO : “आई-वडील, भाऊ, भावजय, भावाचं अख्खं कुटुंब गेलं, माहेरचं स्मशान झालं”

Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं

Chhagan Bhujbal said food grain will supply to flood and rain affected districts orders were given to administration

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI