वाघ पंजाही मारू शकतो, छगन भुजबळांचा भाजपला इशारा

| Updated on: Jun 11, 2021 | 2:25 PM

गेल्या काही दिवसांत शिवसेना भाजपविरुद्ध मवाळ भूमिका घेत आहे का, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. | Chhagan Bhujbal

वाघ पंजाही मारू शकतो, छगन भुजबळांचा भाजपला इशारा
छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील
Follow us on

नाशिक: कोणाशी मैत्री करायची हे वाघाच्या मनावर अवलंबून असतो. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी भाजपला दिला आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना भाजपविरुद्ध मवाळ भूमिका घेत आहे का, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. तेव्हा भुजबळ यांनी म्हटले की, राज्याच्या अनेक प्रश्नांची उत्तर केंद्र सरकारकडे आहेत. त्यामुळे जमवून घ्यावचं लागतं. मात्र, वाघ कधीही पंजा मारू शकतो, असे भुजबळ यांनी सांगितले. (NCP leader Chhagan Bhujbal warns BJP)

ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर भेटीसंदर्भातही भाष्य केले. प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यामुळे अनेक राजकीय पक्षांना यश मिळाले आहे. निवडणूक व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी काही सल्ला दिला तर पवारसाहेब नक्कीच ऐकतील, असे भुजबळ यांनी म्हटले.

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं; छगन भुजबळांची वादाला फोडणी?

‘बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं’

नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चं नाव देणं नाकारलं असतं, असं सांगून नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे नामकरणासाठी लढणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता असून नामकरणाच्या मुद्दयावरून आघाडीत बिघाडी असल्याचं समोर आलं आहे.

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वत:चं नाव विमानतळाला देणं नाकारलं असतं. जे. आर. डी. टाटा यांचं नाव विमानतळाला सूचवलं असतं, असं सांगतानाच नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला.

संबंधित बातम्या:

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमची मैत्री पिंजऱ्यातील नव्हे जंगलातील वाघाशी, आता संजय राऊतंचं उत्तर

आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही; चंद्रकांत पाटलांची डरकाळी

(NCP leader Chhagan Bhujbal warns BJP)