AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही; चंद्रकांत पाटलांची डरकाळी

वाघाशी कुणी मैत्री करत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही; चंद्रकांत पाटलांची डरकाळी
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 5:45 PM
Share

पुणे: वाघाशी कुणी मैत्री करत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातील वाघाशी नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. (we not make friendship with circus tiger, chandrakant patil answer to sanjay raut)

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं. संजय राऊत यांनी मला त्यांच्या मनाविरुद्ध गोड माणूस म्हटलंय. हरकत नाही. पण आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती. आताचा वाघ पिंजऱ्यात आहे. पिंजऱ्यातील वाघाशी आम्ही मैत्री करत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

तर एकटं एकटं लढा

आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. त्यांनीही आज मनाविरुद्ध का असेना पण मला शुभेच्छा दिल्या आहेत. राऊतांचं म्हणणं खरं आहे. आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो. पिंजऱ्यातल्या नाही. जोपर्यंत ते जंगलात होते, तोपर्यंत आमची मैत्री होती. आता ते पिंजऱ्यात आहेत, असं ते म्हणाले. निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं. लढायचंच असेल तर एकटं एकटं लढा. म्हणजे कोणाची किती ताकद आहे हे समजेलच, असं आव्हानही त्यांनी आघाडीला दिलं. तसेच प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही, असंही ते म्हणाले.

अजितदादांना राऊतांचा गुण लागला

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजितदादांना संजय राऊतांचा गुण लागलेला दिसतोय. त्यांच्यावर राऊतांची सावली पडली, गुण लागला, अशी टीका त्यांनी केली. खासदार गिरीश बापट हे पुण्याचे नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वात पुणे महापालिकेची निवडणूक लढवली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत यांनी सकाळी प्रतिक्रिया व्यक्त करताना चंद्रकांत पाटील यांना टोले लगावले होते. वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांना उत्तर दिलं. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा राऊत यांनी दिल्या. नरेंद्र मोदी हे भाजपा आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झालं आहे ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असतं. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असं ते म्हणाले होते. (we not make friendship with circus tiger, chandrakant patil answer to sanjay raut)

संबंधित बातम्या:

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, गोड माणूस चंद्रकांतदादांना शुभेच्छा : संजय राऊत

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली कोरोना लस, माहिती अधिकारातून उघड!

तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, भाजपची शिवसेनेला सर्वात मोठी ऑफर

(we not make friendship with circus tiger, chandrakant patil answer to sanjay raut)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.