चंद्रकांत पाटील म्हणाले, आमची मैत्री पिंजऱ्यातील नव्हे जंगलातील वाघाशी, आता संजय राऊतंचं उत्तर

लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्याकडं पाहिलं जावं. पाटील हे अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आहेत. एखादं लहान मुल कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणत प्रत्युत्तर दिलंय.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमची मैत्री पिंजऱ्यातील नव्हे जंगलातील वाघाशी, आता संजय राऊतंचं उत्तर
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील


मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघाच्या मैत्रीवरुन जोरदार वाक् युद्ध रंगलं आहे. संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त ‘खास’ शुभेच्छा दिल्या आहेत. “चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावं. कार्यकर्त्यांनी आणलेले केप कापावेत. विशेष म्हणजे लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्याकडं पाहिलं जावं. पाटील हे अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आहेत. एखादं लहान मुल कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणत प्रत्युत्तर दिलंय. (Sanjay Raut’s reply to Chandrakant Patil’s statement)

“संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्यानं एक वाघ भेट म्हणून दिला. मी त्याला म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी मैत्री आहे”, असं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला असता, “मी म्हटलं आम्ही मैत्री करण्याचा कायम प्रयत्न करतो. पण आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आम्ही मैत्री कामय होती. पण आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ घालाय”, असा टोला पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.

‘वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’

तत्त्पूर्वी नाशिकमध्ये बोलताना ‘वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या.

‘दि. बा. पाटलांच्या स्मारकाचा वेगळा विचार करावा लागेल’

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करत लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिकांनी साखळी आंदोलन केलं. त्यावर बोलताना दि.बा पाटील हे स्थानिक नेते असल्याने त्यांच्या स्मारकाचा विचार करावा लागेल. मात्र, सध्यातरी नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

‘लोकसभा आणि विधानसभाही एकत्र लढवू’

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही एकत्र लढवू. प्रत्येकाला वाटतं की आपला मुख्यमंत्री व्हावा तो प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे ,नाना पाटोले याना वाटते की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा त्यात गैर काहीच नाही, असंही राऊत यांनी म्हटलंय. नाना पटोले यांच्या स्वबळाच्या मुद्द्यावर राऊत यांनी हे उत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या :

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, गोड माणूस चंद्रकांतदादांना शुभेच्छा : संजय राऊत

तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, भाजपची शिवसेनेला सर्वात मोठी ऑफर

Sanjay Raut’s reply to Chandrakant Patil’s statement