Congress Crisis : काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे, शिर्डीतील शिबिरात मागणी, तर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे अशी मागणीही या शिबिरात झाली अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. याही शिबिरात काँग्रेसमध्ये ठोस आणि पूर्णवेळ केंद्रीय नेतृत्वाची कमरता जाणवली आहेत.

Congress Crisis : काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे, शिर्डीतील शिबिरात मागणी, तर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...
काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे, शिर्डीतील शिबिरात मागणी, तर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 4:33 PM

नाशिक : काँग्रेस पक्षातली (Congress Party) स्थिती सध्या चिंतानजनक आहे. चार वर्षे झाली राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेटण्यासाठी वेळ मिळाली नाही, असे वक्तव्य उदयपूरच्या शिबिरानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले होते. त्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेत्यांचं शिर्डीत शिबीर पार पडलंय. या शिबिराबाबतही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती दिली आहे. काँग्रेसच्या शिर्डीतील शिबरा मध्ये आर्थिक,राजकीय विषयांवर चर्चा झाली. काँग्रेस पक्षाला नवं चैतन्य देण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे अशी मागणीही या शिबिरात झाली अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे याही शिबिरात काँग्रेसमध्ये ठोस आणि पूर्णवेळ केंद्रीय नेतृत्वाची कमरता जाणवली आहेत.

पक्षात राहून मतं मांडयला हवी

तसेच काँग्रेसचे चिंतन शिबीर देखील झालेले नाही. पक्षात निवडणूक प्रक्रिया देखील झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. तर कपिल सिब्बलांनी त्यांचे जी मतं आहेत ती ती त्यांनी पक्षात राहून मांडायला हवी होती, त्यांनी असं बाहेर पडायला नको होतं, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी कडू गोळी

तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी ही कडू गोळी आहे, पण भाजपला हटवायचे असेल तर ही कडू गोळी घ्यावी लागेल याची कल्पना होती म्हणून एकत्र आलो, असे ते म्हणाले आहेत. तर महापालिका निवडणुकींबाबत बोलताना ते म्हणाले, हा राज्यपातळीवरचा निर्णय आहे, स्थानिक पातळीवर हे ठरवायचं आहे, महाविकास आघाडी केली तर भाजपाचा सफाया होईल, तीन पक्षाचे सरकार चालवणे ही तारेवरची कसरत आहे, पहिल्यांदा हा प्रयोग झाल्याने अडचणी होतात, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भाजपवर जोरदार हल्लाबोल

तर यावेळी बोलताना त्यांनी, विविध मुद्द्यांवरून भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे. आठ वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचं दिवाळं वाजलं आहे,  पेट्रोल, डिझेलची दरवाढ झालीय. बेरोजगारीचा दर उच्चांकी पण मोदींना घेणं देणं नाही. प्रचंड वेगाने धार्मिक ध्रुवीकरण, दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणी काय कपडे घालतं, कोणी कशा प्रार्थना करतं यावर चर्चा सुरू आहेत. चीन आपली भूमिका सोडायला तयार नाही.  पगार, पेन्शनचे प्रश्न आहेत. जीडीपीच्या 86 टक्के कर्ज आहे. तर 27 लाख कोटी फक्त कराच्या रूपाने गोळा केले, मात्र  कर्ज काढले तरी सरकार चालत नाही. म्हणून सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.