नाशिकमध्ये डेल्टा व्हॅरिएंटचे 30 रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर, तातडीची बैठक सुरू

कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा हळूहळू वाढताना दिसत आहेत. त्यातच कोरोनाच्या नवनव्या विषाणूंनी आरोग्य यंत्रणेची काळजी वाढवलीय. त्यात नाशिकमध्ये डेल्टा व्हॅरिएंटचे 30 रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

नाशिकमध्ये डेल्टा व्हॅरिएंटचे 30 रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर, तातडीची बैठक सुरू
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 12:57 PM

नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा हळूहळू वाढताना दिसत आहेत. त्यातच कोरोनाच्या नवनव्या विषाणूंनी आरोग्य यंत्रणेची काळजी वाढवलीय. त्यात नाशिकमध्ये डेल्टा व्हॅरिएंटचे 30 रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आलीय.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या तातडीच्या बैठकीत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक अधिकारी उपस्थित आहेत. आता डेल्टा व्हॅरिएंटच्या 30 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेय.

नाशिकमधील कोरोनाची आकेडवारी काय?

नाशिकमधील एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 3 हजार 117 वर गेलीय. यापैकी 3 लाख 93 हजार 516 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 528 जणांचा कोरोनाने बळी घेतलाय.

हेही वाचा :

अधिकाऱ्यांनो, स्वत: लक्ष घालून विकासकामे पूर्ण करा; भुजबळांचं आवाहन

VIDEO: नाशिकमध्ये फांदी तोडण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, 18 बगळ्यांसह पिलांचा मृत्यू, ठेकेदाराला नोटीस

नाशिकमध्ये चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, थेट दुध डेअरीच्या भिंतीला धडक, 23 वर्षीय युवकाचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Corona Delta variant 30 patient found in Nashik emergency meeting