VIDEO: नाशिकमध्ये फांदी तोडण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, 18 बगळ्यांसह पिलांचा मृत्यू, ठेकेदाराला नोटीस

नाशिकच्या गंगापूररोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला. एका झाडावर कुऱ्हाड चालवण्याच्या नादात झाडावरच्या घरट्यांध्ये असलेल्या 18 बगळ्यांचा आणि त्यांच्या पिल्लांचा जीव गेला.

VIDEO: नाशिकमध्ये फांदी तोडण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, 18 बगळ्यांसह पिलांचा मृत्यू, ठेकेदाराला नोटीस


नाशिक : नाशिकच्या गंगापूररोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला. एका झाडावर कुऱ्हाड चालवण्याच्या नादात झाडावरच्या घरट्यांध्ये असलेल्या 18 बगळ्यांचा आणि त्यांच्या पिल्लांचा जीव गेला. यावर वृक्षप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त करत झाड तोडणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर महानगरपालिकेने झाडं तोडणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावलीय.

नाशिक महापालिका आयुक्तांनी ही घटना का झाली याबाबत सविस्तर खुलासा करण्याचे आदेश दिलेत. खुलासा समाधानकारक नसेल तर तातडीने त्यावर कारवाई करण्याचेही आदेश दिलेत. गंगापूर रोड परिसरात झाड पाडल्याने बगळ्यांचा मृत्यू झालाय. यानंतर वनविभागाने ठेकेदाराचे साहित्य जप्त केलेय. दोन इमारतींमधल्या वादात पक्षांचा बळी गेल्याचं बोललं जातंय.

नेमकं काय झालं?

गंगापूर रोड परिसरात एका झाडाच्या फांद्या तोडायचा नावाखाली ठेकेदाराने सर्रास या झाडावर इलेक्ट्रिक कटर चालवलं. मात्र, झाडाच्या फांद्या कोसळल्यानं झाडावरील बगळ्यांचे घरटे एका मागून एक खाली पडू लागले. ठेकेदाराच्या या हलगर्जीपणात बगळ्यांची पिल्लं आणि काही बगळे देखील मृत झाले. रस्त्यावर पडलेले बगळ्यांचे पिल्लं बघून काही नागरिकांनी हे पिल्लं उचलून बाजूला ठेवले आणि तात्काळ वनविभागाला फोन लावला. मात्र, वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत अनेक बगळे आणि त्यांच्या पिलांचा तडफडून मृत्यू झाला होता. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी झाली.

“चौकशी करून ठेकेदारावर कारवाईची मागणी”

दरम्यान वनविभागाने काही जखमी बगळ्यांना आणि त्यांच्या पिल्लांवर उपचार केला आहे. मात्र पक्षीप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाने ठेकेदाराच्या या मनमानीकडे केलेली डोळेझाक या बगळ्यांच्या आणि त्यांच्या पिल्लांच्या जीवावर बेतल्याने संताप व्यक्त होतोय.

हेही वाचा :

VIDEO: माणसांना लाज वाटावी असं कावळ्याचं शहाणपण, व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल

VIDEO | रोलर कॉस्टर राइड सुरु असताना अचानक पक्षी आला आणि…

पेंग्विनमुळे राणीबागेतील पर्यटकांमध्ये वाढ

व्हिडीओ पाहा :

Nashik Commissioner notice contractor in 18 bird death while tree cutting

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI