अवकाळी पावसाने घेतला पिता-पुत्राचा बळी; कांदा काढण्यासाठी गेले आणि…

| Updated on: Mar 14, 2023 | 9:20 PM

समाधानला विजेचा धक्का बसल्याने तो ओरडल्याने त्याच्या दिशेने त्याचे वडिल धावत गेले. त्यावेळी तो खाली पडल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्याला त्यांनी स्पर्श केल्याने समाधानच्या वडिलांचाही जागीच मृत्यू झाला.

अवकाळी पावसाने घेतला पिता-पुत्राचा बळी; कांदा काढण्यासाठी गेले आणि...
Follow us on

मालेगाव : सध्या राज्यातील शेतकरी अनेक संकटांनी ग्रस्त आहे, त्यातच अपघात, विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजही मालेगावमधील खडकी येथेही कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आणि त्यांच्या मुलाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याने खडकी गावावर आता शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यावर अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरीही शेतमाल बाहेर काढण्यासाठी गडबड करत आहे. त्यामुळे खडकीमधीलही पिता पुत्र कांदा काढण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागून वडिलही आणि मुलाचा जागीच मृ्त्यू झाला.

अवकाळी पावसाची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी शेतातील पीक काढण्यासाठी गडबड करत आहे. तर मालेगाव तालुक्यातील खडकीमधील शेतातील विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला विहिरीवर शॉक लागला होता.

त्यामुळे त्याच्या पाठापोठ त्याचे वडिलही त्याला वाचवण्यासाठी मागून पळत जऊन त्याला वाचवण्यासाठी गेले असता त्याच्या वडिलांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत वडिलांचा आणि मुलाचाही एकदम मृ्त्यू झाल्याने खडकीवर शोककळा पसरली आहे.

नाशिक जिल्ह्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील खडकीतील समाधान पंढरीनाथ कळमकर हा युवक आपल्या वडिलासंह शेतात कांदे काढण्यासाठी गेला होता.

समाधानासह त्याचे कुटुंबीयही त्याच्याबरोबर शेतात काम करत होते. त्यांच्या शेतात कांदे काढण्यासाठी मजूर शेतात होते. त्यामुळे त्यांना पाणी आणण्यासाठी म्हणून तो विहिरीवर गेला होता.

आधीच अवकाळी पाऊस परिसरात झाल्याने सगळा परिसरात ओल पसरली होती. पावसामुळे विहिरीवर लावलेल्या मोटारीमध्य शॉर्टसर्किट होऊन वीज मोटारीमध्ये उतरेला होता.

पाण्यासाठी समाधानने मोटर चालू करताच वीज प्रवाह मोटारीमध्ये पसरल्याने त्याचा धक्का त्याला बसल्याने तो जागीच ठार झाला.

मात्र समाधानला विजेचा धक्का बसल्याने तो ओरडल्याने त्याच्या दिशेने त्याचे वडिल धावत गेले. त्यावेळी तो खाली पडल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्याला त्यांनी स्पर्श केल्याने समाधानच्या वडिलांचाही जागीच मृत्यू झाला.

त्यामुळे या दुर्घटनेत पंढरीनाथ पांडुरंग कळमकर यांचाही यामध्ये मृ्त्यू झाला. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.