सत्ताधारी भाजपला नाशिकमध्ये घरचा आहेर; रस्ते कामाच्या चौकशीची आमदार फरांदे यांची मागणी

| Updated on: Sep 22, 2021 | 12:05 PM

ऐन नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर सत्ताधारी भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. भाजप आमदार देवयांनी फरांदे (Devyani Farande) यांनी शहरातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला असून, या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सत्ताधारी भाजपला नाशिकमध्ये घरचा आहेर; रस्ते कामाच्या चौकशीची आमदार फरांदे यांची मागणी
देवयानी फरांदे, आमदार
Follow us on

नाशिकः ऐन नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर सत्ताधारी भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. भाजप आमदार देवयांनी फरांदे (Devyani Farande) यांनी शहरातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला असून, या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Inquire into the inferior work of filling potholes in Nashik, demands BJP MLA Devyani Farande)

नाशिक महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठी शिवसेनेने जोरदार कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे नाशिकमध्ये सध्या तळ ठोकून आहेत. मात्र, दुसरीकडे महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भाजपमध्ये अंतर्गत कलह विकोपाला गेल्याचे चित्र आहे. यापूर्वी डेंग्यूवरून महापालिकेला लक्ष्य करणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांनी आता शहरातील खड्डे भरण्याच्या कामावरून पुन्हा एकदा तोफ डागली आहे. त्यांनी या खड्डे कामाची चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या पत्रात फरांदे यांनी म्हटले आहे की, ‘नाशिक शहरामध्ये पावसामुळे पडलेले खड्डे भरण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. दोन दिवसांत खड्डे भरलेल्या जागी पुन्हा खड्डे पडत आहेत. खड्ड्यातील कच बाहेर आल्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. या कामात केवळ कंत्राटदाराचा फायदा हाच उद्देश असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाची आपण स्वतः पाहणी करावी व चौकशी करावी. काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादी टाकावे. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या खड्डे भरण्याच्या कामाची जोपर्यंत आयुक्त स्वतः पाहणी करून याबाबत अहवाल देत नाहीत, तोपर्यंत कंत्राटदाराची बिले देण्यात येऊ नयेत’, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

सत्ताधारीच आक्रमक; विरोधक शांत

नाशिक महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भाजपविरुद्ध भाजपचेच लोक आक्रमक होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी यापूर्वी डेंग्यूवरून महापालिकेवर टीकेचे आसूड ओडले होते. त्यानंतर भाजपच्या मुकेश शहाणे यांनी विद्युत विभागातील कामाच्या चौकशीबद्दल या विभागालाच टाळे ठोकले होते. मात्र, या साऱ्या प्रकरणार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मौन खरोखर वाखणण्याजोगे आहे. (Inquire into the inferior work of filling potholes in Nashik, demands BJP MLA Devyani Farande)

इतर बातम्याः

चर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत

नाशिकः नांदगाव, साकुरीत पुन्हा पूर; वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

आडव्यातिडव्या पावसाने नाशिकला झोडपले; दोन दिवस दमदार अंदाज