AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आडव्यातिडव्या पावसाने नाशिकला झोडपले; दोन दिवस दमदार अंदाज

नाशिक (Nashik) शहरात आज सकाळपासून दमदार पावसाने (Rain) पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

आडव्यातिडव्या पावसाने नाशिकला झोडपले; दोन दिवस दमदार अंदाज
नाशिकमध्ये दुपारपासून पाऊस सुरू आहे.
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 11:26 AM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) शहरात आज सकाळपासून दमदार पावसाने (Rain) पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. (Presence of rain in Nashik, Chance of rain in North Maharashtra, Meteorological Department forecast)

नाशिक शहरात पहाटे साडेचारपासून पावसाने हजेरी लावली. सकाळी आठच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यानंतर अवघे काही मिनीट कमी झालेल्या पावसाने सकाळी दहापासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिक शहारातील द्वारका, पंचवटी, रामकुंड, शालिमार, अशोकामार्ग, इंदिरानगर, महात्मानगर, काठेवाडीसह इतर भागही चिंब झाले आहेत. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या पूर्व राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडील जैसलमेर ते पूर्वेकडील डाल्टनगंजपर्यंत सक्रिय असून, पश्चिम बंगालमध्ये गंगेचा मैदान परिसर आणि तामिळनाडू किनाऱ्यावर चक्रीय चक्रावात आहे. या सोबतच दक्षिण कर्नाटक ते कामोरीन असाही कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धरणांवर जमाबंदी

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.

वाघूरच्या साठ्यात वाढ

जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचा साठा हा 60.84 वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे.

वैतरणा भरले

मुंबईकला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे. (Presence of rain in Nashik, Chance of rain in North Maharashtra, Meteorological Department forecast)

इतर बातम्याः

नाशिकः नांदगाव, साकुरीत पुन्हा पूर; वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

चर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.