Nashik | कर्तव्य बजावताना नाशिकच्या जवानाचे अपघाती निधन, चिमुकलीचा पित्याला मुखाग्नी

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील किशोर गंगाधर शिंदे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. मंगळवारी कर्तव्यावर असताना त्यांचं अपघाती निधन झालं होतं.

Nashik | कर्तव्य बजावताना नाशिकच्या जवानाचे अपघाती निधन, चिमुकलीचा पित्याला मुखाग्नी
नाशिकच्या जवानाचं अपघाती निधन
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 3:31 PM

नाशिक : कर्तव्यावर असताना अपघाती निधन झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील (Nashik) निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील किशोर गंगाधर शिंदे (Kishor Shinde) यांचे निधन झाले. ते सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. मंगळवारी कर्तव्यावर असताना त्यांना अपघात झाला होता. गावातून त्यांची अत्यंयात्रा निघाली, त्यावेळी ‘भारत माता की जय’ , ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यांच्या अंत्ययात्रेला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तीन वर्षांच्या चिमुकलीवर आपल्या वडिलांना मुखाग्नी देण्याची वेळी आल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर यांनी पुष्पचक्र अर्पण करत किशोर शिंदे यांना आदरांजली वाहिली. यावेळी ठिकठिकाणी गावातील महिलांसह नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत जवानाला श्रद्धांजली अर्पण केली.

जवानाचे अपघाती निधन

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील किशोर गंगाधर शिंदे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. मंगळवारी कर्तव्यावर असताना त्यांचं अपघाती निधन झालं होतं.

चिमुकलीचा वडिलांना मुखाग्नी

शिंदेंच्या अंत्ययात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांच्या वतीने त्यांना सलामी देण्यात आली. यानंतर किशोर गंगाधर शिंदे यांच्या पार्थिवाला चिमुकल्या वेदिकाने मुखाग्नी दिला. तीन वर्षांच्या चिमुकलीवर आपल्या वडिलांना मुखाग्नी देण्याची वेळी आल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

संबंधित बातम्या :

सोलापूरच्या जवानाला अखेरचा निरोप, रात्री दीड वाजता अख्खं गाव लोटलं, दोन महिन्यांच्या लेकाचं पितृछत्र हरपलं

सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप, शहीद रोमित चव्हाण यांच्या अंत्यसंस्काराला जनसागर, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Nashik | शहीद जवान क्षीरसागर यांना अखेरचा निरोप; अंत्यसंस्काराला जनसागर, अमर रहेच्या घोषणा