AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरच्या जवानाला अखेरचा निरोप, रात्री दीड वाजता अख्खं गाव लोटलं, दोन महिन्यांच्या लेकाचं पितृछत्र हरपलं

जवान रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रहिवासी होते. 2012 मध्ये ते सैन्य दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध भागात सेवा बजावली. नुकतेच ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते.

सोलापूरच्या जवानाला अखेरचा निरोप, रात्री दीड वाजता अख्खं गाव लोटलं, दोन महिन्यांच्या लेकाचं पितृछत्र हरपलं
सोलापूरच्या जवानावर अंत्यसंस्कारImage Credit source: टीव्ही9
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 18, 2022 | 9:42 AM
Share

सोलापूर : छत्तीसगड येथे कर्तव्य बजावताना सोलापूरच्या (Solapur) बार्शीतील जवान रामेश्वर काकडे शहीद (Martyr) झाले. उपचार सुरु असताना काकडेंनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री दीड वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी पहाटे रामेश्वर काकडे (Rameshwar Kakade) यांची प्रकृती खालावलेली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सैन्य रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांच्या वतीने देण्यात आली.  शहीद रामेश्वर काकडे बीएसएफमध्ये कार्यरत होते.

जवान रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रहिवासी होते. 2012 मध्ये ते सैन्य दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध भागात सेवा बजावली. नुकतेच ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते.

वडिलांकडून मुखाग्नी

छत्तीसगड येथे कर्तव्य बजावताना सोलापूरच्या बार्शीतील जवान रामेश्वर काकडे यांना वीरमरण आले. उपचार सुरु असताना काकडेंनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव बार्शीत दाखल झाले. तर रात्री दीड वाजता त्यांचे मूळ गाव गौडगाव येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वैजिनाथ काकडे यांनी त्यांना मुखाग्नी दिला.तर यावेळी सीआरपीएफच्या वतीने मानवंदना देखील देण्यात आली.

रात्रीच्या अंधारातही गाव लोटला

रात्री उशीर झालेला असताना देखील संपूर्ण गाव जवान रामेश्वर काकडे यांना अखेरची सलामी देण्यासाठी हजर होते. रामेश्वर काकडे यांना अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यावेळी जवान रामेश्वर काकडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने हे देखील उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

आधी भ्याड हल्ला, मग भारतीय जवानांची हत्यारंही पळवली, नक्षलवाद्यांच्या प्रेस नोटमध्ये काय मागण्या?

 शहीद जवान क्षीरसागर यांना अखेरचा निरोप; अंत्यसंस्काराला जनसागर, अमर रहेच्या घोषणा

सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप, शहीद रोमित चव्हाण यांच्या अंत्यसंस्काराला जनसागर, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?