Malegoan : भुरट्या चोरांचा मजुरांच्या खिश्याला फटका, कष्टाचे पैसे-मोबाईल आणि इतर वस्तू लुटल्या, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Jul 24, 2022 | 11:44 AM

CCTV : देवळा तालुक्यातील उमराणे येथे चोरीची घटना, चोरटे सीसीटीव्हीत कैद

Malegoan : भुरट्या चोरांचा मजुरांच्या खिश्याला फटका, कष्टाचे पैसे-मोबाईल आणि इतर वस्तू लुटल्या, घटना सीसीटीव्हीत कैद
Follow us on

मालेगाव : अनेकदा लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे काही क्षणात पळवून नेतात. हे पैसे जर मजुयांचे असतील तर त्यांनी उन्हातान्हात घाम गाळून कमावलेले पैसे चोरांनी नेले तर त्यांची आयुष्यभराची कमाई जाते. अशीतच घटना मालेगावात (Malegoan) घडली आहे.  भुरट्या चोरांनी कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यात काम करणाऱ्या मजुरांचे कष्टाचे पैसे,मोबाईल आणि इतर वस्तू चोरून नेल्याची संतापजनक घटना देवळा तालुक्यातील उमराणे येथे घडली. दोन्ही चोरटे सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेत आहे. उमराणे येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे खळे असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मुक्कामी मजूर काम करतात. कांदा व्यापारी बाळासाहेब देवरे यांचे मुबंई आग्रा महामार्गालगत कांद्याचा खळा आहे. त्यांच्याकडे काही मजूर त्यांच्या कुटुंबियांसह राहतात.या मजुरांना आठवड्याला मजुरी दिली जाते.खळ्यावर काम करणाऱ्या मजुरांना दोन दिवसा पूर्वीच मजुरूची रक्कम मिळाली होती ती त्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवली होती.

उमराणे येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे खळे असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मुक्कामी मजूर काम करतात. कांदा व्यापारी बाळासाहेब देवरे यांचे मुबंई आग्रा महामार्गालगत कांद्याचा खळा आहे. त्यांच्याकडे काही मजूर त्यांच्या कुटुंबियांसह राहतात.या मजुरांना आठवड्याला मजुरी दिली जाते.खळ्यावर काम करणाऱ्या मजुरांना दोन दिवसा पूर्वीच मजुरूची रक्कम मिळाली होती ती त्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवली होती.

हे सुद्धा वाचा

मजूर गाढ झोपेत असताना दोन चोरटे खळ्याच्या शेडमध्ये आले आणि ज्या बॅगेत पैसे ठेवलेले होते त्या बॅगसोबत सर्वांचे मोबाईल आणि इतर वस्तू चोरून पसार झाले. मात्र खळ्यात लावलेले सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून त्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. चोरांच्या या चोरीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय कष्टकऱ्यांची कमाई चोरी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.