Nashik : पावसाची उघडीप, पीक मशागतींच्या कामांना वेग, उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

मनोहर शेवाळे

| Edited By: |

Updated on: Jul 24, 2022 | 11:17 AM

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांमध्ये तण वाढले आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. चार दिवसांपासून देवळ्याच्या वासोळसह परिसरात पावसाने चार उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून, मका,बाजरी, सोयाबीन कोळपणी तसेच निंदनीची लगबग सुरू आहे.

Nashik : पावसाची उघडीप, पीक मशागतींच्या कामांना वेग, उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न
पावसाने उघडीप दिल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये शेती मशागतीची कामे सुरु आहेत
Image Credit source: TV9 Marathi

नाशिक : (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणी होताच सुरु झालेला पाऊस आता महिन्याभराने ओसरला आहे. त्यामुळे मध्यंतरी (Agricultural cultivation) शेती मशागतीची कामे रखडली होती. पावसामुळे शेताकडे फिरकणेही शक्य न झाल्याने पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढले होते तर फवारणीची कामेही झालेली नाहीत. आता गेल्या चार दिवसांपासून (Rain) पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवस उजाडला की शेतकरी मशागतीच्या काम करीत आहे. योग्य वेळी योग्य ती मशागत झाली तर पिकांची वाढ झपाट्याने होणार आहे. शिवाय सततच्या पावसामुळे पिकांच्या वाढीवरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे रखडलेली कामे आणि उत्पादनवाढीच्या अनुशंगाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. यातच जुलै महिन्याच्या अंतिम टप्प्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.

कोळपणीवर शेतकऱ्यांचा भर

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांमध्ये तण वाढले आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. चार दिवसांपासून देवळ्याच्या वासोळसह परिसरात पावसाने चार उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून, मका,बाजरी, सोयाबीन कोळपणी तसेच निंदनीची लगबग सुरू आहे. लवकर काम उरकावे यासाठी काही शेतकरी एक बैल जोडीला दोन -दोन कोळपे लावुन कोळपणी करीत आहे. यंदा सोयाबीनचे क्षेत्रात वाढ झाली आहे. आता पिकांची निघराणी केली तरच उत्पादनात वाढ होणार आहे.

पावसाची उघडीप

नाशिकसह राज्यात पावसाने उघडीप दिली असून मिळालेल्या उघडीपीचा फायदा शेतकरी घेत आहेत. हंगामाच्या सुरवातीच्या काळापासूनच नाशिक जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी राहिलेली आहे. तर जुलै महिन्यात सलग पाऊस लागून राहिल्याने काही क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. उर्वरित पिकांमधून उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न हे सुरु आहेत. त्यामुळे कोळपणी, निंदणी, हातडुबे यातून तण काढण्याचे काम शेत शिवारात सुरु आहे.

पुन्हा पावसाचा धोका

सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी आगामी चार ते पाच दिवसांमध्ये सबंध राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. याची प्रचिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांना येत आहे. आता जर पावसामध्ये सातत्य राहिले तर शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. खरिपातील सोयाबीन आणखी रोपअवस्थेत आहे. त्याची वाढ झाली तर पावसाचा धोका नाही पण आता पाऊस झाला तर मात्र नुकसान अटळ आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI