AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विहिरीत कोणीतरी डोकावत असल्याचे पाहिल्यानंतर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली, मग…

विहिरीत कोणीतरी डोकावत असल्याचे पाहिल्यानंतर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली, त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी घराकडं धूम ठोकली,

विहिरीत कोणीतरी डोकावत असल्याचे पाहिल्यानंतर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली, मग...
leopard Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 09, 2023 | 9:09 AM
Share

शैलेश पुरोहित, इगतपुरी : इगतपुरी (igatpuri) तालुक्यात एका बिबट्याला (leopard) काल वनविभागाच्या (forest department) पथकाने जीवदान दिले, बिबट्या विहिरीत होता, याची कल्पना कुणालाही नव्हती. शेतकऱ्याला संशय आल्याने त्याने विहीरीत डोकावून पाहिले, त्यानंतर बिबिट्याने जोराचा आवाज केला. त्यानंतर घाबरलेल्या शेतकऱ्यांनी ही माहिती तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झालं, त्यानंतर वाघाला ताब्यात घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, अखेरीत बिबट्या त्या पिंजऱ्यात गेल्यानंतर साऱ्यांनीच निः श्‍वास सोडला.

बिबट्याने जोरात डरकाळी फोडली

इगतपुरी तालुक्यातील शेनीत येथे संजय जाधव यांच्या शेतात त्यांची खाजगी विहीर आहे. जाधव हे विहिरीवर गेले असता विहिरीत कोणीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वाहिले असता बिबट्या असल्याचे समजले. विहिरीत कोणीतरी डोकावत असल्याचे पाहिल्यानंतर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली. ही माहिती त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन वन विभागाच्या कार्यालयात दूरध्वनी द्वारे माहिती दिली.

विहीर सुमारे तीस फूट खोल…

वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस,यांच्या मार्गदर्शन खाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक फैज अली सय्यद, राहुल घाटेसाव गोरख बागुल, वाहन चालक मुजाहि्द शेख आदी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. ज्या विहिरीत बिबट्या पडला होता ती विहीर सुमारे तीस फूट खोल होती. विहिरीतील दगडाच्या कपारी वर बिबट्या बसला होता. सोडलेल्या पिंजऱ्यामध्ये येण्यास बिबट्या बाहेर असलेल्या गोंधळामुळे अनुत्सुक होता; मात्र सुमारे एक तास त्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर बिबट्या पिंजऱ्यात बसला. त्यामुळे साऱ्यांनीच निःश्‍वास सोडला.

Follow Us
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?