AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरहरी झिरवाळांचा मुलगा शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत; पक्षप्रवेश करणार? जयंत पाटील म्हणाले…

Jayant Patil on Gokul Zirwal : जयंत पाटील यांनी गोकुळ झिरवाळ यांनी लावलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी 'शिवस्वराज्य यात्रा'च्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा बातमी सविस्तर.....

नरहरी झिरवाळांचा मुलगा शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत; पक्षप्रवेश करणार? जयंत पाटील म्हणाले...
जयंत पाटील
| Updated on: Sep 24, 2024 | 1:38 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या सुरु आहे. ही ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज नाशिकमध्ये आहे. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर गोकुळ झिरवाळ यांनी लावले आहेत. त्यामुळे गोकुळ झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

गोकुळ झिरवाळ यांनी बॅनर लावले याचा अर्थ असा की, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची काही चर्चा झालेली नाही. तसा संपर्क झालेला नाही. त्यांनी उमेदवारीचा अर्ज केलेला आहे. पण आमच्या पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.

गोकुळ झिरवळ शरद पवार गटात प्रवेश करणार?

गोकुळ झिरवळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही दिवसांआधी त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. आता आज राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत ते सहभागी झालेत. जयंत पाटलांच्या स्वागत मिरवणुकीतखासदार भास्कर भगरेंसोबत गोकुळ झिरवळ आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून गोकुळ झिरवाळ निवडणूक लढण्याची चर्चा आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.

राष्ट्रवादी शरग पवार गटाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज नाशिकमध्ये आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , अमोल कोल्हे , महेबुब शेख, रोहिणी खडसे यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात जात दर्शन घेतलं. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी नाशिक दौऱ्यावर आहे. नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात जाण्यापूर्वी त्रंबकेश्वराचे दर्शन घेतलं. शरद पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील त्रंबकेश्वर मंदिरात यावेळी उपस्थित होते. आता नाशिकमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. यात गोकुळ झिरवळ उपस्थित आहेत.

असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.