Nashik leopard rescue video: बिबट्याला वनविभागाचे जीवदान; पिंजरा विहिरीत सोडून केली सुटका!

| Updated on: Apr 21, 2022 | 4:48 PM

नाशिक जिल्ह्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला (Forest Department) यश मिळाले आहे. नाशिक तालुक्यातल्या गिरणारेजवळच्या वाडगावमध्ये ही घटना घडली. येथे भक्ष्याच्या शोधात फिरताना बिबट्या विहिरीत पडला होता. त्याची वर येण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड सुरू होती.

Nashik leopard rescue video: बिबट्याला वनविभागाचे जीवदान; पिंजरा विहिरीत सोडून केली सुटका!
नाशिकमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात आले.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) बिबट्या (leopard) आणि मानव संघर्ष नवा नाही. गेल्या वर्षात तर अशा अनेक घटना घडल्या. घरातल्या अंगणात खेळणाऱ्या बाळाला उचलून पळणाऱ्या बिबट्याशी दोन हात करणारी आई तुम्हाला इथेच दिसली. जोडीला थेट गावात घुसून गावकऱ्यांवर हल्ला करणारा बिबट्याचा थरारही जिल्ह्याने अनुभवला. मात्र, आज घडलेली घटना थोडी वेगळीय. नाशिक जिल्ह्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला (Forest Department) यश मिळाले आहे. नाशिक तालुक्यातल्या गिरणारेजवळच्या वाडगावमध्ये ही घटना घडली. येथे भक्ष्याच्या शोधात फिरताना बिबट्या विहिरीत पडला होता. त्याची वर येण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड सुरू होती. मात्र, विहिरीत पाणीही होते. विहिरीची खोलीही कमीत कमी पन्नासेक फूट सहज असेल. मात्र, बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच नागरिकांनी वनविभागाला कळवले. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक पिंजरा आणला. तो दोरी लावून आत सोडला. पिंजरा विहिरीत आल्यानंतर बिबट्याने त्यात हळूच उडी मारली. या पिंजऱ्याला पुन्हा दोरीच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे एका बिबट्याचा आज जीव वाचलाय.

हिंस्त्र प्राणी शहराकडे

बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत. निसर्गाला ओरबाडने मानवाने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत.
इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!