Nashik : मालेगावात खडीकरण रस्ता आणि फरशी पूल वाहून गेला, दळणवळण ठप्प

| Updated on: Jul 24, 2022 | 4:34 PM

Nashik : मालेगावात खडीकरण रस्ता आणि फरशी पूल वाहून गेला

Nashik : मालेगावात खडीकरण रस्ता आणि फरशी पूल वाहून गेला, दळणवळण ठप्प
Follow us on

मालेगाव, नाशिक : यंदा सगळीकडेच चांगला पाऊस (Nashik Rain) होतोय. नाशकातही यंदा वरुणराजाची कृपा राहिली आहे. अश्यात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कळवणच्या पश्चिम पट्ट्याला पावसाने झोडपून काढल्याने पाळे खुर्द-असोली दरम्यानचा खडीकरण रस्ता आणि फरशी पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे दळणवळण ठप्प झाले आहे. शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी दुप्पट वाहतूक खर्च मोजवा आहे.तर हिंगवे शिवारातील सिमेंट बंधाऱ्याचा बाजूचा भराव वाहून गेल्याने बंधाऱ्यातील सर्व पाणी वाहून गेलं आहे. सुमारे पाचशे एकर शेत जमिनीला शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.एकाच वेळी बंधारा आणि रस्ता खचल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दोन्ही कामांना प्राधान्य देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

रस्ता वाहून गेला, वाहतूक ठप्प

नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या पश्चिम पट्ट्याला पावसाने झोडपून काढल्याने पाळे खुर्द-असोली दरम्यानचा खडीकरण रस्ता आणि फरशी पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे दळणवळण ठप्प झाले आहे. शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी दुप्पट वाहतूक खर्च मोजवा आहे.तर हिंगवे शिवारातील सिमेंट बंधाऱ्याचा बाजूचा भराव वाहून गेल्याने बंधाऱ्यातील सर्व पाणी वाहून गेलं आहे. सुमारे पाचशे एकर शेत जमिनीला शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तर चांगला पाऊस झाल्याने मालेगावात शेती कामांनाी वेग आलाय.

हे सुद्धा वाचा

कोळपणी तसेच निंदनीच्या कामाला वेग

सतत सुरू असलेल्या पवासामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या मशागतीचे काम ठप्प झाली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून देवळ्याच्या वासोळसह परिसरात पावसाने चार उसंत दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून, मका,बाजरी, सोयाबीन कोळपणी तसेच निंदनीची लगबग सुरू असल्याने बळीराजा सुखावला असून.लवकर काम उरकावे यासाठी काही शेतकरी एक बैल जोडीला दोन – दोन कोळपे लावुन कोळपणी करीत आहे.पाऊस सुरू होण्यापूर्वी मशागत करवून घेण्याकडे भर देत आहे.