AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | महापौर आणि स्थायी समिती सभापती यांचे अधिकार प्रशासकाकडे, गेल्या साडेपाच महिन्यांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू

नाशिक महापालिकेत आता पुर्णपणे प्रशासन राज आले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज एक मोठा निर्णय घेत स्थायी समिती सभापती आणि महापाैर हे पद प्रशासानाकडे घेतले असून त्यासंदर्भात सर्व अधिकार आता प्रशासनाकडेच असणार आहेत.

Nashik | महापौर आणि स्थायी समिती सभापती यांचे अधिकार प्रशासकाकडे, गेल्या साडेपाच महिन्यांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू
| Edited By: | Updated on: Aug 24, 2022 | 2:26 PM
Share

नाशिक : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका (Election) कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निवडणूका साधारणपणे आॅक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात होणार आहेत. आता नाशिक महापालिकेचे महापौर आणि स्थायी समिती सभापती यांचे अधिकार प्रशासकाकडे आहेत. 2017 ला महापालिकेच्या (Municipality) निवडणूका पार पडल्या होत्या. 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आता महापालिकेतील सर्व अधिकार प्रशासनाकडे आले असून सध्या नाशिक महापालिकेमध्ये प्रशासन (Administration) राज बघायला मिळतंय. आता स्थायी समिती सभापती आणि महापाैर पदही प्रशासानाकडे आले असून यादरम्यान शहराच्या विकासासाठी नेमके कुठले महत्वाचे निर्णय प्रशासनाकडून घेतले जाणार हे बघण्यासारखेच ठरणार आहे.

स्थायी समिती सभापती आणि महापाैर हे पद प्रशासानाकडे

नाशिक महापालिकेत आता पुर्णपणे प्रशासन राज आले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज एक मोठा निर्णय घेत स्थायी समिती सभापती आणि महापाैर हे पद प्रशासानाकडे घेतले असून त्यासंदर्भात सर्व अधिकार आता प्रशासनाकडेच असणार आहेत. ज्यावेळी नाशिक महापालिकेची निवडणूक होईल, त्यावेळी परत हे पद लोकप्रतिनिधींकडे जाईल. मात्र, तोपर्यंत हे दोन्ही पद प्रशासनाकडे असतील.

महापालिकेत आता अधिकाऱ्यांची होणार महासभा

विशेष म्हणजे आयुक्तांच्या या निर्णयानंतर महापालिकेत आता अधिकाऱ्यांची महासभा होईल. गेल्या साडेपाच महिन्यांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. आता महासभेमध्ये आयुक्त नेमके काय काय निर्णय घेतात यावर माजी नगरसेवकांचे लक्ष आहे. आयुक्तांनी शहरातील खराब रस्त्यांवरून तीन दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांची एक बैठक घेत ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. इतकेच नाही तर शहरातील खराब रस्त्यांची आयुक्त स्वत: पाहणी देखील करणार आहेत.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!