आधी नवीन रस्त्यांचे बांधकाम, आता गॅस पाईपलाईनच्या नावाखाली खोदकाम, नाशिक महापालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार

तर ऐन पावसाळ्यात चांगले रस्ते खोदल्याने नाशिककरांचा दररोजच प्रवास चिखलयम झाला आहे. (Nashik New Road digging for gas pipeline corruption in Municipal Corporation)

आधी नवीन रस्त्यांचे बांधकाम, आता गॅस पाईपलाईनच्या नावाखाली खोदकाम, नाशिक महापालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार
Nashik Road work Problem
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 11:25 AM

नाशिक : शेकडो कोटी रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले नाशिक शहरातील रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आले आहे. नाशिक महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीतून यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींना केला. तर ऐन पावसाळ्यात चांगले रस्ते खोदल्याने नाशिककरांचा दररोजच प्रवास चिखलयम झाला आहे. (Nashik New Road digging for gas pipeline corruption in Municipal Corporation)

अवघ्या वर्षभरापूर्वी नाशिक शहरात तब्बल एक ते दोन हजार कोटी रुपये खर्च करत अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र पालिकेचे हे रस्ते गॅस पाईपलाईनच्या नावाखाली खोदले जात आहेत. विशेष म्हणजे हे खोदलेले रस्ते पावसाळा सुरु होऊनही दुरुस्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे पाऊस पडायला सुरुवात झाल्याने हा सर्व भाग चिखलमय झाला आहे.

पालिकेचे आर्थिक नुकसान

नाशिक शहरातील सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिक रोड अशा सर्वच भागातील रस्त्यांची गॅस पाईपलाईनच्या ठेकेदाराने पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरत नासाडी केली. शहरातील सामान्य नागरिकांना नळ कनेक्शन अथवा इतर कामासाठी रस्ता खोदायचा ठरला. तर तीन ते साडेतीन फुटासाठी 5 हजार रुपये इतका दर आकारला जातो. मात्र या ठेकेदाराला केवळ 2 ते 3 हजार रुपये इतका दर आकारत अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंधातून मेहरबानी दाखवत पालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे.

सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाईचा आदेश

नाशिकमधील 205 किलोमीटरच्या रस्ते खोदकामासाठी या ठेकदाराकडून नियमांनुसार 160 ते 170 कोटी रुपयांची नुकसान भरपाई घेणं अपेक्षित आहे. मात्र पालिकेने केवळ 78 कोटी रुपयांची भरपाई घेतल्याने पालिकेच अधिकाऱ्यांच्या चिरीमिरीसाठी तब्बल 80 ते 90 कोटींच नुकसान झाले आहे. या गैर कारभाराविरोधात पालिकेच्या महासभेत काही लोकप्रतिनिधींनी आंदोलन करत आवाज उठविण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र महासभा ऑनलाईन असल्याने सत्ताधाऱ्यांनी त्यांना म्युट करत या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत कारवाई करण्यास टाळाटाळ केली.

मात्र पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

गॅस पाईपलाईनच्या भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण

नाशिक शहराचा सर्वच भागात गॅस पाईपलाईनच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. पालिकेतील शहर अभियंता संजय घुगे आणि संबंधित गॅस पाईपलाईन ठेकेदार यांच्यातील आर्थिक हित-संबंधातून तयार झालेल्या अभद्र युतीमुळे शहरातील रस्त्यांची नासाडी झाली आहे. त्यामुळे पालिकेतील वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी कारवाई करो अथवा ना करो, मात्र भविष्यात या प्रकरणाची शासनाकडून चौकशी झाली तर या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांना नक्कीच गजाआड व्हावे लागेल. विशेष म्हणजे पालिकेच्या याच विभागात यापूर्वी भुयारी गटार,पावसाळी गटार प्रकरणात अनेक अधिकाऱ्यावंर निलंबनाची कारवाई झाल्याचेही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आता याच विभागात या गॅस पाईपलाईनच्या भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Nashik New Road digging for gas pipeline corruption in Municipal Corporation)

संबंधित बातम्या : 

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नाशिककरांचा प्रवास चिखलमय, कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

मालेगावात यंत्रमाग उद्योगाला अवकळा; कापडाला मागणीच नसल्याने कारखाने पुन्हा बंद

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.