AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लाल वादळ मुंबईच्या दिशेने…”; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी विधानभवनावर धडकणार

नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च काढण्यात आला असून कष्टकरी, कर्मचारी, आदिवासी बांधवांकडून सरकारवर आता मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कष्टकरी वर्गाने केला आहे.

लाल वादळ मुंबईच्या दिशेने...; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी विधानभवनावर धडकणार
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 13, 2023 | 5:38 PM
Share

नाशिक : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी काम पाहिले होते. त्यावेळीही अशाच प्रकारचा लाँग मार्च निघाला होता. त्यावेळी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून त्यावेळी आंदोलन मिठवण्यात आले होते. तर आता मात्र नाशिकमधून निघालेले लाल वादळ विधानभवनावर धडकणारच असल्याचा ठाम निर्धार किसान सभेने केला आहे. त्यामुळे उद्या लाल वादळ विधानभवनावर आल्यानंतर आता सरकारतर्फे आंदोलनकर्त्यांशी बोलणार कोण असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सरकारसमोर आता नवीन पेच निर्माण झाला आहे.

किसान सभेचा निघालेला लाँग मार्च आता मुंबईत धडकण्याआधी नाशिकच्या पुढे आला आहे. हा लाँग मार्च निघत असला तरी, रस्त्यावर शेतमाल फेकत आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाल वादळ आता मुंबईकडे येत आहे. किसान सभेच्या या लाँग मार्चमध्ये आता सरकारच्या अनेक धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवल्यामुळे या लाँग मार्चला आता सरकार कसं तोंड देणार ते आता उद्याच कळणार आहे.

किसान सभेचे अजित नवले , जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला असून यामध्ये आता कष्टकरी, आदिवासी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या वर्गाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आता मागे हटणार नाही असंही आता स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च काढण्यात आला असून कष्टकरी, कर्मचारी, आदिवासी बांधवांकडून सरकारवर आता मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कष्टकरी वर्गाने केला आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी किसान सभेबरोबर संवाद साधून आंदोलन मिठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे आता उद्या मुंबईत लाल वादळ धडकल्यानंतर सरकारतर्फे किसान सभेबरोबर संवाद कोण साधणार असा सवाल आता केला जात आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?