AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१०८ हेल्पलाईन हेल्पलेस, दोन तास प्रतिक्षा, अखेर गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू

राज्यातील वैद्यकीय व्यवस्था कशी मरणासन्न अवस्थेत आहे याची उदाहरण घडले आहे. परभणीत एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा एम्ब्युलन्स अभावी तिच्या पोटातील बाळासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

१०८ हेल्पलाईन हेल्पलेस, दोन तास प्रतिक्षा, अखेर गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू
108 ambulance
| Updated on: Aug 10, 2026 | 3:42 PM
Share

परभणीत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना नांदेडला हलवण्याचा सल्ला दिला होता. मात्र १०८ एम्ब्युलन्सला एकदा नव्हे तर सात वेळा कॉल केला गेला आणि दोन तासांहून अधिक वेळ उलटूनही ही एम्ब्युलन्स काही आली नाही, आणि या गर्भवती महिलेचा तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. परभणीच्या जिल्हा स्री रुग्णालयात ८ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेची अवस्था किती विदारक आहे याची चुणूक मिळत आहे.

जिंतूर येथील साठेनगरातील नेवाती मोहल्ला येथे राहणाऱ्या शेख अमीन शेख अयुब यांच्या पत्नी मर्जीनाबी अमीन शेख या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. ८ ऑगस्ट रोजी त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना उपचारासाठी परभणीच्या जिल्हा स्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी मरजीनाबी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यास तेथील डॉक्टरांनी सांगितले.

यानंतर या महिलेच्या पतीने सात वेळ १०८ रुग्णवाहिका हेल्पनंबरला संपर्क केला. तरीही दोन तास रुग्णवाहिका पोहचली नाही. त्यामुळे या गर्भवती महिलेचा तिच्या पोटातील बाळासह मृत्यू झाला. या प्रकरणात पतीच्या फिर्यादीवरुन रुग्णवाहिका चालक, त्यावरील डॉक्टर आणि परभणीच्या स्री रुग्णालयाती डॉक्टर अशा पाच जणांविरोधात रविवारी पहाटे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आता १०८ रुग्णवाहिकेला नेमके किती वाजता कॉल केले गेले ? कॉल नेमका किती वाजता रिसिव्ह झाला. त्यावेळी उपलब्ध रुग्णवाहिका नेमकी कुठे होती ? आणि रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचण्यास उशीर का झाला ? या प्रश्नांची उत्तरे हवी असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील १०८ रुग्णवाहिकेसाठी सात वेळा फोन, २ तास प्रतीक्षा आणि अखेर ७ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे अत्यंत संतापजनक असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सामान्य माणसाच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी केला आहे. राज्याचे ‘इन्फ्रामॅन’ म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगली गेलेली लक्तरं दिसत नाहीत का? राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना सरकार गाढ झोपेत आहे, हे चीड आणणारं आहे असे रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे.

येथे पोस्ट वाचा –

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत