AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxman Hake : प्रसाद लाडच्या कंपनीमुळे सरकारी नोकऱ्या निघत नाहीत, लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

"जरांगेच्या गाडीवर कोणी दगडफेक करत नाही. हा स्वतःच स्वतःच्या गाडीवर दगडफेक करुन घेईल. स्वराज्य उभे राहताना बळी कुणाचा गेला? 18 पगड जातीने, स्वराज्य उभे करताना जीव दिला तेव्हा तुम्ही कुठे होतात?"

Laxman Hake : प्रसाद लाडच्या कंपनीमुळे सरकारी नोकऱ्या निघत नाहीत, लक्ष्मण हाके असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil - Prasad Lad
| Updated on: Aug 10, 2026 | 3:47 PM
Share

लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर सुद्धा बोचऱ्या शब्दात टीका केली. “प्रसाद लाड याने नोकऱ्या संपवल्या आहेत. प्रसाद लाड म्हणतो ठोकून काढतो मग जरांगे जें बोलतो त्याला काय उत्तर का देत नाही?. जरांगे पाटील हे लूत भरलेलं कुत्र्ं आहे. ते कोणालाही चावत आहे” असा शब्दात जरांगे पाटलांवर टीका केली. “प्रसाद लाडला सर्च केले तेव्हा त्याच्या क्रिस्टल कंपनीचे नाव आले. प्रसाद लाड याने स्वतः सांगितले की मी एक लाख नोकऱ्या दिल्या. त्याच्या कंपनीने राज्यातील सर्व मंत्रालयातील टेंडर घेतले. त्याच्या कंपन्यांमुळे सरकारी नोकऱ्या निघत नाहीत. प्रसाद लाडने त्याच्या कंपनीत SC, ST, OBC ना किती संधी दिली?. मुख्यमंत्री महोदय प्रसाद लाडच्याच कंपनीला टेंडर कसे काय मिळते” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला.

“जरांगे तू पश्चिम महाराष्ट्रात आलाय पण इथलो ओबीसी, भटके यांची संख्या माहिती आहे का? जरांगेला कोण कोण भेटायला गेले याची लिस्ट आम्ही केलीय. गावगाड्यातील ओबीसी एक झाला तर काय होईल ते बघा. तहसीलदार स्टेट्स ठेवतात की कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. त्याचे स्टेटस मी तुम्हाला दाखवतो. कुणबी दाखल्यात खाडाखोडी केल्यात. सरपंचापासूनसत्तेपर्यत यांची माणसे आहेत. लोकशाहीत काही वेगळे सत्तास्थान निर्माण झाले का? दुर्देव आहे की ओबीसीतील 9 मंत्री आहेत. पण त्यातील एकही मंत्री यावर बोलत नाही” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

जरांगे तू काय दुजाभाव सहन केला?

“दहीहंडे नामक व्यक्तीचे बोगस डॉक्युमेंट दाखवले.पत्रकार परिषदेत बोगस प्रमाणपत्र दाखवले. मनोज जरांगे तू जर खरा मराठा जातीचा असशील तर दहिहंडे याचे दाखले खरे आहेत म्हणून सांग. दहीहंडे याचे दाखले बोगस केले आहेत. आम्ही सामाजिक दुजाभाव सहन केला जरांगे तू काय दुजाभाव सहन केला?. दौंड, कोल्हापूर येथील नगराध्यक्ष, महापौर यांनी काय दुजाभाव सहन केला? चौथी नापास माणसाचे ऐकून मुख्यमंत्री महोदय तुम्ही ओबीसी आरक्षण संपवले” असं लक्ष्मण हाके बोलले.

बहुजन चळवळीत ओबीसीला काय दिले?

“प्रसाद लाड भामट्याला सांगा. मुख्यमंत्री महोदय तुम्ही त्या प्रसाद लाडला सांगा की भाजपच्या सत्तेचा मार्ग माधवच्या माध्यमातून आलाय. आम्ही आंदोलन करूच पण डिजिटलच्या माध्यमातून जेन झी ला आम्ही आवाहन करतो. बहुजन चळवळीत ओबीसीला काय दिले? बहुजनचा लाभ केवळ मराठ्यांनी घेतला” असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

हाके चुकीचं बोलतोय असे सांगावे

“सर्व ओबीसी सबकमिटी आणि मंत्री मंडळातील मंत्र्यांनी बोला की आरक्षण गेलय. ओबीसी कमिटीने सांगावे की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही. हाके चुकीचं बोलतोय असे सांगावे. मराठा समाजाच्या स्पर्धेत ओबीसी उतरू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांवर ब्राह्मण म्हणून राग असेल तर त्याचा राग ओबीसीवर काढताय तुम्ही” असं लक्ष्मण हाके बोलले.

जरांगे हा ओबीसी द्वेषने पेटला आहे

“दुसऱ्या जातीच्या व्यक्तीला जातीवरून बोलता नंतर त्याच्या वर्णद्वेशावरून बोलता. मंडल दिन साजरा झाला तेव्हा तू बोलला का? त्याच्या बॅनरवर व्हिपी सिंह, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांचे फोटो आहेत का? जरांगे हा ओबीसी द्वेषने पेटला आहे. मुख्यमंत्र्यांवर जरांगेला बोलायला प्रसाद लाड याने सांगितले असा आमचा आरोप आहे” असं हाके बोलले. “जरांगेच्या गाडीवर कोणी दगडफेक करत नाही. हा स्वतःच स्वतःच्या गाडीवर दगडफेक करुन घेईल. स्वराज्य उभे राहताना बळी कुणाचा गेला? 18 पगड जातीने, स्वराज्य उभे करताना जीव दिला तेव्हा तुम्ही कुठे होतात?

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना