“अशा स्थितीत रॅली काढणे म्हणजे आपली संवेदनशीलता निघून जाईल”; भाजप नेत्याने शेतकऱ्यांना दिला दिलासा…

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांना मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वकिली करणार आहे.

अशा स्थितीत रॅली काढणे म्हणजे आपली संवेदनशीलता निघून जाईल; भाजप नेत्याने शेतकऱ्यांना दिला दिलासा...
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 9:43 PM

मालेगाव/नाशिक : मार्च महिन्यात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली होती. त्या नुकसानीचे पंचनामे होऊन मदत मिळण्याआधीच आता पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आता दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे, तर दुसरीकडे भाजपची सावरकर गौरव यात्रा चालू होती. मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामुळे अवकाळी पावसांपासून हा शेतकरी मुक्त होईल अशी प्रार्थना करू अशी इच्छा व्यक्त केली आहे.

तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्यामुळे मी रॅली काढण्यास नकार दिला असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने आजचा दिवस हा रॅली काढण्याचा नाही असं मत त्यांनी रॅलीविषयीही व्यक्त केले.

गेल्या दोन दिवसांपासून बागलाण, सटाणामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या अशा स्थितीत रॅली काढणे म्हणजे आपली संवेदनशीलता निघून जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांची अवस्था सध्या वाईट आहे.

मात्र सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सांगण्यासाठी मी योग्य वकील असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीविषयी बोलताना सांगितले की, मी गेल्या वीस वर्षांपासून विधानसभेत आहे. पण दुःख हे आहे की, गेल्या तीन वर्षांपासून अवकाळी पावसाने बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे ही जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या या काळजीमुळेच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही बांधावर आहेत. अधिकाऱ्यांच्या भरवशावर कधीही सरकार चालू शकत नाही, कारण सरकारने स्वतः बांधावर जायला हवं अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाला टोलाही लगावला आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांना मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वकिली करणार आहे. त्याच बरोबर हा देश टिकला पाहिजे आणि राष्ट्रही मजबूत झाले पाहिजे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.