Chhagan Bhujbal : अंजली दमानिया यांच्या आरोपांना छगन भुजबळ यांचं थोडक्यात उत्तर म्हणाले, चौकशी कसली करता…

Chhagan Bhujbal on Anjali Damania : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या चौकशीचं काय?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, चौकशी कसली करता...

Chhagan Bhujbal : अंजली दमानिया यांच्या आरोपांना छगन भुजबळ यांचं थोडक्यात उत्तर म्हणाले, चौकशी कसली करता...
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 12:59 PM

नाशिक | 08 ऑक्टोबर 2023 : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील चौकशीचं काय झालं?, असा सवाल समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चौकशी कसली करता मला काही माहिती नाही. महाराष्ट्र सदन केसमधून आम्ही डीचार्ज झालो. त्यांनी कसली मागणी केली आहे त्याची मला काही कल्पना नाही. मुंबईच्या चारिटेबल ट्रस्टची कुठलीच केस नाही. जी आहे ती चॅरेटीकडे आहे. पूर्वीचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी केलेली केस आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.

दमानिया यांचा आरोप काय?

अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार? भुजबळांवरील आरोपांच्या चौकशीचं पुढे काय झालं? विधिमंडळात दिलेल्या आश्वासनांनुसार या संदर्भातील फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकार कधी दाखल करणार? अशी विचारणा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी सांगितले की छगन भुजबळ यांच्या विरोधात 2013 मध्ये जी आम्ही तक्रार दाखल केली होती. त्याच्यानंतर त्यांना अटक झाली. बरीच वर्षे ते जेलमध्ये पण होते. देशपांडेच्या मॅटरमध्ये त्याच न्यायाधिशांनी म्हटलं होतं की, आम्हाला कुणालाही सोडता येणार नाही आणि भुजबळ यांना मात्र डिस्चार्ज मिळाला. अँटी करप्शन ब्युरोनंतर हे प्रकरण हायकोर्टात जायला हवं होतं. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांना आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.

नाशिकमध्ये मोठ्याप्रमाणात ड्रग्स सापडलं. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसात 500- 600 कोटींचा ट्रक सापडतो. माझ्यासाठी सुद्धा ही धक्कादायक बातमी आहे. एकाच गावात जिल्ह्यात एकाच शहरात नाशिकमध्ये हे सापडतं. औषध बनवण्याचा कारखाना असेल असं दाखवलं असेल त्या डिपार्टमेंटच्या लोकांना कसं हे समजलं नाही. त्यांच्या लक्षात आले नाही की हे वेगळं प्रकरण आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा ड्रग्स नशा करणाऱ्या पर्यंत जगभर गेले असतील. आता त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होत आहे. मला काही कलापणा नाही कोणाचं दुर्लक्ष झाले असेल. जर सरकार दरबारी सांगितलं गेलं तर त्याच्यावर कारवाई होते, असं छगन भुजबळ म्हणाले.

Non Stop LIVE Update
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.