निर्यातीच्या नावाखाली द्राक्ष शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक, नाशिकमध्ये 7 जणांना अटक

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना पाडवा अ‌ॅग्रो सोल्युशन फर्म या कंपनीने तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

निर्यातीच्या नावाखाली द्राक्ष शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक, नाशिकमध्ये 7 जणांना अटक
द्राक्ष

नाशिक: जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची प्रकरण नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात समोर आली होती. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पाडवा अ‌ॅग्रो सोल्युशन फर्म कंपनीच्या 7 संशयित आरोपींना अटक नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर, दिंडोरी, निफाड सह इतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची द्राक्षं निर्यातीच्या नावाखाली फशवणूक करण्यात आली होती. (Nashik Rural Police arrested seven person for not paid grapes money to farmers from three months)

तीन चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पैसे थकवले

तीन चार महिने उलटल्यानंतरही द्राक्षे माल घेऊन तरी या कंपनीने जवळजवळ अडीच ते तीन कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नव्हते. जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती पुढं आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना पाडवा अ‌ॅग्रो सोल्युशन फर्म या कंपनीने तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये दिंडोरी,त्रंबकेश्वर, निफाड,चांदवड या तालुक्यांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.या कंपनीने शेतकऱ्यांकडून एक्स्पोर्ट द्राक्ष खरेदी केली,मात्र त्यांना पैसे दिलेच नाही.जे चेक दिले गेले, त्या अकाउंटवर पैसे नसल्याचं समोर आलं, अडीच ते तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

अजित पवारांकडे तक्रार

जवळजवळ 50 ते 60 शेतकऱ्यांची यात फसवणूक झाल्याची माहिती आहे.संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील 7 जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.पाच जण मिळून ही कंपनी सुरू केली होती.मात्र शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तर देत.त्यांची फसवणूक केली आहे.या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे ही या कंपनी बाबत तक्रार केली आहे. तसेच जो पर्यंत आमचे पैसे मिळत नाही. तोपर्यंत अटक केलेल्याना जामीन मिळू नये, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन

नाशिक ग्रामीण पोलिसांनी कंपनीच्या 7 जणांना अटक करुन त्यांची चौकशी सुरु केली आहे.तसेच अजून जर काही शेतकऱ्यांची या संदर्भात फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी अस आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केलं आहे.

इतर बातम्या

चंद्रकांत पाटील म्हणाले अमित शाहांना पत्र लिहिणार, उदय सामंत म्हणतात हा तर सहकार मोडण्याचा डाव

भारताच्या बासमती तांदळाचा जगभर डंका, 125 देशांमध्ये 30 हजार कोटींची निर्यात

(Nashik Rural Police arrested seven person for not paid grapes money to farmers from three months)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI