CCTV VIDEO: कार-दुचाकीचा भीषण अपघात;समोरासमोर धडकून युवक कारवरुन खाली कोसळला

CCTV VIDEO: कार-दुचाकीचा भीषण अपघात;समोरासमोर धडकून युवक कारवरुन खाली कोसळला
Nashik accident Satapur
Image Credit source: TV9

नाशिकः नाशिक शहरातील (Nashik City) सातपूर येथे काल रात्रीच्या सुमारास एक तीस वर्षीय तरुणाचा भीषण अपघात (Accident) झाला. या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद्य झाली आहेत. वाहनांची जास्त वर्दळ नसली तरी या व्हिडिओमध्ये तुरळक वाहनांची ये-जा आहे. रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहने ये जा करत आहेत. व्हिडिओमध्ये जो अपघात कैद्य झाला आहे त्यामध्ये रिक्षा […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 16, 2022 | 11:38 PM

नाशिकः नाशिक शहरातील (Nashik City) सातपूर येथे काल रात्रीच्या सुमारास एक तीस वर्षीय तरुणाचा भीषण अपघात (Accident) झाला. या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद्य झाली आहेत. वाहनांची जास्त वर्दळ नसली तरी या व्हिडिओमध्ये तुरळक वाहनांची ये-जा आहे. रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहने ये जा करत आहेत. व्हिडिओमध्ये जो अपघात कैद्य झाला आहे त्यामध्ये रिक्षा गेल्यानंतर एका कार येताना दिसत असून ती कार रस्त्याच्या मधोमध असतानाच दुचाकीवरील युवकाने कारला येऊन समोरासमोर धडक दिली आहे. ही धडक ही इतकी भयानक होती की, दुचाकीवरील युवक धडक बसल्याबरोबर कारवरुन खाली पडला आहे. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला आहे.

नाशिक शहरातील सातपूरमध्ये झालेल्या या अपघातात जखमी युवकाचे नाव गंधर्व नंदा आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर त्याला नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. गंधर्व हा आपल्या वैयक्तिक कामासाठी दुचाकीवरुन निघाला होता. त्यावेळी सातपूरमधील एका रस्त्यावर हा अपघात झाला. सीसीटीव्हीमध्ये कारने अचानक वळण घेतले असल्याने कारच्या समोरुन येणाऱ्या गंधर्वने कारलाच समोरासमोर धडक मारली. यामध्ये दुचाकी कारला आदळून युवक कारवरुन खाली पडला आहे.

 

दुचाकीस्वार कारवरुन कोसळला

सातपूरमधील रस्त्यावर ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी कारचालक शिवाजीनगरकडे निघाला होता. व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे कार रस्त्याच्या मधोमध येत असतानाच  कारच्या समोरुन येणाऱ्या दुचाकीने कारला धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, दुचाकीवरील युवक दुचाकीवरुन उडून कारवरुन खाली कोसळला आहे. त्यामुळे या अपघातात तो जखमी झाला आहे. कार आणि दुचाकी समोरासमोर आदळल्यामुळे दोन्हीही वाहनांचे नुकसान झाले आहे.

या अपघातात जखमी झालेला युवक गंधर्व याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. कारचे थोडेफार नुकसान झाले आहे. कारला धडकल्यामुळे कारवरुन युवक खाली कोसलळा असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

संंबंधित बातम्या

VIDEO : उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा मोबाईल खेचून पोबारा, घटना सीसीटीव्हीत कैद

Bank Fraud : सर्व्हर हॅक करत बँकेला दीड कोटींचा चुना, डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील घटना

Safe Holi : होळीचं रंग बेरंग होऊ नये, यासाठी रंग खेळताना नेमकी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें