Supriya Sule: आता ट्रम्प यांच्या नेतृत्वात काम करू… सुप्रिया सुळे यांची कुणाला कोपरखळी? मनसेचं नाव घेत असा काढला चिमटा
NCP MP Supriya Sule Big Comment: आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात काम करू अशी कोपरखळी सुप्रिया सुळे यांनी मारली. एनडीएसोबतच्या चर्चांवर त्यांनी तिरकस बाण सोडला. तर मनसेचे नाव घेत चर्चा करणाऱ्यांना चिमटा काढला.

NCP MP Supriya Sule Big Comment: गेल्या एका आठवड्यात ‘ऑपरेशन तुतारी’चा आवाज कानोकानी घुमला. पण घडलं काहीच नाही. शरद पवार यांची राष्ट्रवादी NDA सोबत घरोबा करण्याच्या चर्चांनी रान उठवले. जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या पंचतारांकित बैठकीचा धुराळा खाली बसत नाही तोच दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधीमंडळ परिसरातील दालनात बैठक झाल्याची बातमी धडकली. लागोलाग फोटोही आलेत. मग ना ना चर्चा, तर्क-वितर्क, राजकीय भूकंप, राजकीय गणितं मांडली गेली. नाशिकमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी या घडामोडींवर कोपरखळी केली. आता ट्रम्प यांच्या नेतृत्वात काम करू असा जोक आमच्या एका ग्रुपवर पाठवल्याचा चिमटा त्यांनी या चर्चेनंतर काढला
सूत्रांवर कोपरखळी
नाशिकमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी बातम्या देणार्या सूत्रांवर कोपरखळी मारली. हे सूत्र आम्हाला रोज एक पक्षात पाठवत आहेत. फक्त मनसे मध्ये त्यांनी अद्याप आम्हाला पाठवले नाही, असा चिमटा सुळेंनी काढला. आता ट्रम्प च्या नेतृत्वात काम करू अस मी एक जोक आमच्या ग्रुप मध्ये पाठवल्याचे त्यांनी सांगितले. फुटण्यासाठी आम्ही निवडून आलो नाही. तर पॉलिसी ठरवण्यासाठी आम्ही निवडून आलो आहोत. गेल्या दोन दिवसापासून मी जरा व्यथित आहे. कोण सूत्र आहेत मला माहिती नाही आमच्या बाबत मीडियात काही बातम्या सुरू आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
अंधश्रद्धेवर सडकून टीका
शिक्षणाने समानता दिली. भगरे सर देखील आज शिक्षणामुळे खासदार झाले. शिक्षणाला महत्व आहे हे चव्हाण साहेबांनी दाखवून दिले. माझी श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही . निवडणुकीत आमचे खासदार निवडून येऊ दे असं मी पांडुरंग कडे मागत नाही. नवीन पिढी अंधश्रद्धाकडे का वळत आहे हे मला समजत नाही. कोल्हापूरची चप्पल आज पॅरिस मध्ये मिळत आहेत. बिना चप्पल चे फिराल तर कोल्हापुरी चप्पल आणि बटाचे काय होईल दाबोळकर यांच्या सारखे आपल्या महाराष्ट्र ला लाभले.
मी जाहीर पणे आज मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करते. त्यांनी बुवा बाजी ला आळा घालता अशा लोकांना जेल मध्ये टाकलं. माझे आणि मुख्यमंत्री यांचे टोकाचे मतभेद आहेत पण चांगले कामाचे कौतुक केले पाहिजे. महिला जी घरामध्ये स्वयंपाक करतात त्यांचे देखील कौतुक आहे. घराच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता त्यामागे कुणाचे तरी त्याग असतो. 21 व्या शतकात महाराष्ट्र कुठे चालाय याचा विचार आपण केले पाहिजे. अंधश्रद्धा वाढत आहे. पुरुषांच्या बरोबर आज महिला काम करत आहेत मग स्त्री हत्या का होतायत. बुवाबाजी राज्यात का वाढत आहे याचा विरोधात आपण कधी बोलणार. ड्रग मोठ्या प्रमाणात मिळत आहे याच्या विरोधात लढा दिला पाहिजे नाही म्हणायला आपल्याला लेकी ला शिकवा हुंडा देणार नाही हे ठामपणे सांगितले पाहिजे तुम्हाला पुढे जाऊन नेतृत्व करायचं आहे . जावायाला गाडी साठी पैसे देऊ नका. त्याला त्याच्या पैसे ने घेऊ दे . इलेक्ट्रिक गाडी असेल तरच लग्न करणार अस सांगा. यशवंतराव चव्हाण यांचा हा महाराष्ट्र आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी दाभोलकर यांनी काम केलं आहे. कायदा केला मात्र अंमलबजावणी झालेली नाही. २१ शतकात तंत्रज्ञानाच्या युगात आपण पुढे आहोत. दुर्दैव हे आहे महिला बुवाबाजी मध्ये भरकटला आहेत. सोशल मीडियावर आमची चेष्टा केली जाते . अंधश्रद्धा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशी सडकून टीका त्यांनी अंधश्रद्धा आणि हुंडा प्रथेवर केली.
अजून एक मंगलकार्य
आमच्याकडे सध्या लग्न कार्य सुरू आहे. पहिले युगेंद्र, जय, मग रेवती आणि आता पार्थ पवार याचे आहे. पवारांच्या मुलानी ठरवले आहे यंदा बँड वाजवायचा. अजून एक गोड बातमी आहे ती तुम्हाला लवकर कळेल, अशी माहिती सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
भारतात गरीब कष्ट करणाऱ्या लोकांना न्याय का मिळत नाही बाकीच्यांना सूट असते. महाराष्ट्रात आणि देशात तीन मोठे क्रायसिस सुरू आहे. महाराष्ट्रात क्राइम वाढलेले आहे. जो डेटा भारत सरकारला मिळाला त्यात पुण्यात शिक्षणाचे हे माहेरघर आहे. ते राज्यात एक नंबर आहे. ड्रग्स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. युवा पिढी त्यात वाया चालली आहे. पोलिसांची भीती राहिलेली नाही. नगरसेवक डॉक्टर वर हात उचलतो. असले नगरसेवक होताच कामा नये, असे सुळे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेची एसआयटीकडून चौकशी करा
लाडकी बहीण योजनेची SIT चौकशी करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. आठ लाख महिला केवायसी मधून काढल्या. मनमोहन सिंग यांच्या काळात जनधन सुरू झाले. घरा घरात आधारकार्ड आहेत. जनधन योजनेचा डंका वाजवला मग लाडक्या बहिणींचे केवायसी का नाही करू शकले. भारत सरकारचा डेटा सांगतो की अनेक लोक भारत सोडून चालले आहे हा माझा डेटा नाही. आंतरराष्टीय गुंतवणूक होत नाही. सोन घेऊ नका ही इकॉनॉमिकल क्रायसिस आहे ना. या सर्वांचे परीक्षण केले का ? असा सवाल सुळे यांनी विचारला.
कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली नाही अंमलबजावणी झालेली नाही घोषणा फक्त केलेली आहे. सगळ्या लाडक्या बहिणीनं पैसे मिळाले का त्यात किती पुरुष आणि सरकारी अधिकारी आले कसे. जयंत पाटील यांचा आउटस्टँडिंग परफॉर्मर आहे मुख्यमंत्री यांनी देखील गांभीर्याने घेतले आहे. आमच्यात प्रत्येक सेशन मधे भाषण करतो प्रत्येक खासदार बोललाच पाहिजे. नवे खासदार देखील आता बोलत आहेत, असे सुळे म्हणाल्या.
मंदिरातील भ्रष्टाचारावर चिंता
नुसते आरोप करून चालणार नाही. मला विश्वास बसत नाही मर्यादा पुरुषोत्तम राम ज्याचे संस्कार सगळ्यांवर आहे. अनेक नेत्यांनी ही मंदिर व्हावे यासाठी लढा उभा केला होता. त्यात मंदिरात भ्रष्टाचार होत असेल तर यापेक्षा गलिच्छ काय आहे, असा सवाल त्यांनी केला. उज्जैन, अयोध्या, सिद्धिविनायक येथे भ्रष्टाचार होत आहे. भ्रष्टाचार करणारा वाईट आणि जो बघतो ते पण वाईटच आहे. याची चौकशी का झालेली नाही प्रत्येक भारतीयाला उत्तर द्यावे लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.