कांद्याचा – वांदाच, आवक घटूनही दर घसरलेलेच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 02, 2021 | 5:34 PM

नाशिकमध्ये कांद्याची आवक तर कमी होत आहे पण त्याचबरोबर दरही घटत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत.

कांद्याचा - वांदाच, आवक घटूनही दर घसरलेलेच
संग्रहित छायाचित्र.

नाशिक: शेती मालाची आवक घटली तर दर वाढतात हे बाजारपेठेचे सुत्रच असतं. मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत हे उलटं होताना दिसत आहे. कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये कांद्याची आवक तर कमी होत आहे पण त्याचबरोबर दरही घटत आहेत. (Farmer) त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत. (Onion) साठवणुकीच्या काळातही नुकसान आणि आता बाजारातही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. (nashik onion current rate today Onion imports increase prices become cheaper)

बाजारपेठेत उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा कांद्याची लागवड कमी झाली होती. असे असतानाही दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला होता. मोठ्या आवधीनंतर आता दर वाढतील अशी अपेक्षा कांदा उत्पादकांना होती. परंतू, शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आनक घटूनही क्विंटलमागे 150 ते 200 रुपयांची घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला कांद्याचे दर स्थिर होते. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 लाख 77 हजार क्विंटलची आवक झाली होती. या दरम्यान प्रति क्विंचल 1650 रुपयांचा दर होता. 15 ऑगस्ट नंतर पुन्हा कांद्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून उतरती कळा लागलेली आहे. आवक सर्वसाधारण असतानाही कांद्याचे दर हे 1500 रुपयांवर आले आहेत. कांद्याच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच आहे. एका रात्रीतून दर वाढल्याने कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने यावेळी मात्र शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

दर घटण्याची ही आहेत कारणे

बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा आलेला नाही. शिवाय सध्या बाजारात दाखल होत असलेला कांदा हा साठवणुकीतला आहे. ग्राहकांमधूनही मागणी होत नसल्याने व्यापारी मागतेल त्या दरात शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करावी लागत आहे.

माय-बाप सरकारने तरी दिलासा द्यावा

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यातच कांद्याला केवळ 12 ते 14 रुपयांप्रमाणे दर मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक बाजू लक्षात घेता मदत करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने 30 किलो प्रमाणे कांद्याची खरेदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

कांद्याच्या वजनातही घट

बाजारपेठेत दाखल होत असलेला कांदा हा उन्हाळी आहे. गेली अनेक दिवस साठणूक केलेला कांदा मार्केटमध्ये येत आहे. त्यामुळे वजनात तर घटच आहेच शिवाय कांद्याचा दर्जा खालावलेला आहे. अनेक दिवसानंतर आता कुठे योग्य दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. परंतु, बाजारपेठेत आवक कमी होऊनही कांद्याचे दर हे वाढलेले नाहीत.

(nashik onion current rate today Onion imports increase prices become cheaper)

इतर बातम्या :  

यूरीयाची चढ्या दरानं विक्री, शेतकऱ्याकडून भांडाफोड; कृषी विभागात खळबळ, कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द

झेंडूचं फूल तोडल्यानं मारहाण, पपईची बाग कापून बदला, नंदुरबार पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

टोमॅटो उत्पादकांची परवड सुरुच, सांगली सोलापुरात टोमॅटो रस्त्यावर फेकले; येवल्यात शेतात मेंढ्या सोडत संताप

LPG सिलिंडरच्या अनुदानाचे पैसे का मिळत नाहीत?, कंपनीनं दिली महत्त्वाची माहिती#LPGPrice #LPGPriceIncreased #LPGSubsidyhttps://t.co/EUhGwyM0HA

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI