मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही काय?; शरद पवारांचं पहिल्यांदाच थेट उत्तर

| Updated on: Nov 15, 2021 | 10:48 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नसल्याचं वारंवार सांगितलं जातं. त्यावर विरोधकांकडून कोणतंही उत्तर दिलं जात नाही.

मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही काय?; शरद पवारांचं पहिल्यांदाच थेट उत्तर
sharad pawar
Follow us on

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नसल्याचं वारंवार सांगितलं जातं. त्यावर विरोधकांकडून कोणतंही उत्तर दिलं जात नाही. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला पूर्णविराम दिला आहे. विरोधकांकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, असं शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं.

शरद पवार हे आज निफाडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्याविरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभं राहिलं. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, असं पवार म्हणाले.

बंदचा निर्णय नैराश्यातून

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे हिंसक पडसाद उमटले. त्यावरही पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्रिपुरा घडलं म्हणून महाराष्ट्रात असं घडण योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या आहेत. या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असताना बंदचा निर्णय नैराश्यातून घेण्यात आला. सार्वजनिक शांततेला धक्का बसेल असं काम एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करताय हे दुर्दैव आहे. तीन चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं जात आहे.- याचा फटका सामान्यानांच बसतो, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्र्यांच्या चौकश्यांवरही भाओष्य केलं. विरोधकांच्या दृष्टीने ही भावना झाली की असं होणार. अधिकाऱ्यांचा यासाठी वापर केला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात सहभाग आहे, असं ते म्हणाले.

नक्षलवादाचा ट्रेंड महाराष्ट्रात वाढतोय असं नाही

यावेळी त्यांनी नक्षलवादावरही भाष्य केलं. नक्षलवादाचा ट्रेंड महाराष्ट्रात वाढत आहे असं नाही. ज्यांनी खरोखरच नक्षलवादी विचार स्वीकारले ते वेगळे आहेत. असा वर्ग फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही. आदिवासींवर अन्याय झाला आणि त्यांनी आंदोलन केलं की त्यांना नक्षलवादी ठरवता. यावर बॅलन्स ठेवायला हवा. माझ्या दृष्टीने हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. सोशित लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल. पोलीस बळाचा वापर करून हा प्रश्न सुटेल असं म्हणणं असत्य आहे. तिकडे विकास करायला हवा. तिथल्या लोकांना संधी द्यायला हवी, असंही त्यांनी सांगितलं.

जिथे आहात तिथेच प्रश्न सोडवा

यावेळी त्यांनी एसटीच्या संपावरही भाष्य केलं. तुम्ही जिथे आहात तिथेच प्रश्न सोडवले पाहिजे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा असं म्हणणं योग्य नाही. न्यायालयानेही याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे यातून कामगारांचं नुकसान होत आहे. एकादशीला असंख्य लोक वारीला जातात. आज त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या आस्थेला धक्का बसविण्याचं काम केलं जात आहे, असं ते म्हणाले.

गोखलेंची दखल घेण्याची गरज नाही

अभिनेते विक्रम गोखले यांनी स्वातंत्र्याबाबतच्या अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन केलं. त्याबाबत पवारांना विचारण्यात आलं. त्यावर अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असं मला वाटत नाही. अशी माणसं असतात समाजात, असा टोला पवारांनी लगावला.

बाबासाहेबांना श्रद्धांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं. त्यावरही त्यांनी शोक व्यक्त केला. पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी काळजी घेतली. असे योगदान देणारे पुरंदरे आपल्यात नाहीत. त्यांनी शिवछत्रपतींच्या इतिहास ठेवला. तो वादग्रस्त ठरला. मात्र त्यावर बोलण्या इतका मी इतिहास अभ्यासक नाही. संपूर्ण आयुष्य ज्यांनी या कामात घातलं त्यांच्या बद्दल अशा बदनाम्या केल्या जातात. ते यांच्या बाबतही घडलं असावं, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

Babasaheb Purandare Death LIVE Update | राज ठाकरेंकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

प्रत्येकवेळी माझेच खरे म्हणून चालत नाही; तुटेपर्यंत ताणू नका, अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

काँग्रेसचं ठरलं ? प्रज्ञा सातवांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी, हिंगोलीत बळ मिळणार?