काँग्रेसचं ठरलं ? प्रज्ञा सातवांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी, हिंगोलीत बळ मिळणार?

विशेष म्हणजे मुळ गावी म्हणजेच हिंगोली-कळमनुरीतही प्रज्ञा सातव सक्रिय आहेत. कार्यकर्त्यांच्या, महिलांच्या विविध कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रज्ञा सातवांना विधान परिषदेची संधी दिल्यानं काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

काँग्रेसचं ठरलं ? प्रज्ञा सातवांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी, हिंगोलीत बळ मिळणार?
प्रज्ञा सातव यांची विधान परिषद पक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त

दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी काँग्रेसनं केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानं जी जागा रिक्त झालीय, त्याच जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात येईल. जुलै 2024 पर्यंत त्याची टर्म आहे. विशेष म्हणजे याच जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाचीही चर्चा आहे.

राज्यसभेचे खासदार असताना राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या जागी रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं. राज्यात शरद रणपिसेंचं निधन झालं, त्यामुळे विधान परिषदेची जागा रिक्त आहे. ह्या दोन जागांपैकी एका जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. आधी तर त्यांना राज्यसभेवरच घेतलं जाईल अशीही चर्चा रंगली. पण त्यांचा अनुभव पहाता त्यांना विधान परिषद मिळेल यावरच भर दिला गेला. आणि आता त्याच चर्चेनुसार प्रज्ञा सातव यांची आमदारकी जवळपास निश्चित मानली जातेय. पण काँग्रेसचं राजकारण हे शेवटपर्यंत धक्का देणारं असतं, त्यामुळे काहींना कहानीत ट्विस्ट येईल असं वाटतं. तर राजीव सातव यांचे गांधी कुटुंबियांशी असलेले संबंध पहाता, प्रज्ञा सातव यांच्याविरोधात कुठलीच खेळी यशस्वी होणार नाही आणि त्या विधान परिषदेवर जातील असं काँग्रेसच्या गोटातून निश्चितपणे सांगितलं जातंय. विशेष म्हणजे हे वृत्त दिल्लीतून येतंय.


आणि प्रज्ञा सातव सक्रिय झाल्या !
राजीव सातव यांच्या निधनानंतर काही महिन्यातच प्रज्ञा सातव ह्या मुलासह गांधी कुटुंबियांच्या भेटीला गेल्या. निमित्त होतं मुलाला मिळालेलं भरघोस यश. राहुल गांधी, प्रियंका गांधींची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनीही सातवांच्या मुलाचं कौतूक केलं. कोरोनाच्या खडतर काळात वडीलांचं निधन आणि त्यात मुलानं मिळवलेलं यश कौतुकास्पदच. काँग्रेस नेत्यांनीही त्याची जाण ठेवली. गांधी भेटीनंतरच प्रज्ञा सातव राजकारण सक्रिय होणार याची चर्चा सुरु झाली. नंतर त्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीला गेल्या. काँग्रेसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतात. विशेष म्हणजे मुळ गावी म्हणजेच हिंगोली-कळमनुरीतही प्रज्ञा सातव सक्रिय आहेत. कार्यकर्त्यांच्या, महिलांच्या विविध कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रज्ञा सातवांना विधान परिषदेची संधी दिल्यानं काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

हे सुद्धा वाचा!

Weather Alert: राज्यातून थंडी गायब, अवकाळी पावसाच्या सरी, काय आहे ढगाळ वातावराणाचं कारण?

Zodiac Signs | मृदू मन, मनमिळावू स्वभाव, पण रागवल्यावर या 3 राशींचा नादच करू नका, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

रत्नागिरी जिल्हा हादरला! साखरपा, संगमेश्वर, देवरूख परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI