नाशिकच्या आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकर आक्रमक, छात्रभारतीकडून निलंबनाची मागणी

नाशिकमध्ये रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने तब्बल 22 रुग्णांना ऑक्सिजनविना आपला जीव गमावावा लागलाय.

नाशिकच्या आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकर आक्रमक, छात्रभारतीकडून निलंबनाची मागणी
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 5:42 PM

नाशिक : नाशिकमध्ये रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने तब्बल 22 रुग्णांना ऑक्सिजनविना आपला जीव गमावावा लागलाय. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करत निलंबन करण्याची मागणी केलीय. छात्रभारती विद्यार्थी संघटनेने देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आयुक्तांचं तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली (Pravin Darekar demand suspension of Nashik Commissioner in Oxygen Tank Leak).

प्रविण दरेकर म्हणाले, “नाशिकमध्ये घडलेली घटना ह्रद्य हेलावणारी आणि व्यथित करणारी आहे. या घटनेत स्वाभाविकपणे हलगर्जीपणा सरकारचाच आहे. महापालिका असो की जिल्हा ते सरकारच्या नियंत्रणात काम करत असते. या साथीरोगात महापालिका क्षेत्रात आयुक्तांना अधिकार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी आयुक्तांची आहे. कारण अशाकाळात महापालिकांना किंवा जिल्हा परिषदांना अधिकार नसतात. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतात. या खात्याचं नियंत्रण करणारी लोकं आणि सरकार यांची ही जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचं आणि सरकारचं नियोजनच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर असतं. म्हणूनच याला सरकार जबाबदार आहे आणि आयुक्त दोषी आहेत.”

“या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”

“मी नाशिकला जातो आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देणं, यंत्रणेत काय दोष होते, काय करायला पाहिजे अशा महत्त्वाच्या सूचना सरकारला करु. विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधू. या प्रकरणी आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे. आयुक्तांवरच गुन्हा दाखल करा. शेवटी तुम्ही ऑक्सिजनचं कंत्राट ज्याला दिलं तो कोण आहे, कसा आहे, त्याची यंत्रणा कशी आहे या बारिकसारिक गोष्टी ज्या जीविताशी संबंधित आहेत त्यांची खूप काळजी घ्यायला पाहिजे. म्हणूनच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच पुन्हा अशा घटना होणार नाही याची काळजी घ्यावी. ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवावं,” असंही दरेकर म्हणाले.

दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले.”

छात्रभारतीही आक्रमक, आयुक्तांचं तातडीने निलंबन करण्याची मागणी

छात्रभारती विद्यार्थी संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आयुक्तांना तातडीने हटवण्याची मागणी केलीय. छात्रभारतीचे राज्यसंघटक समाधान बागूल यांनी पत्रात म्हटलं, “नाशिक शहरातील शासकीय झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला गळती झाली आणि ऑक्सिजन अभावी आतापर्यंत या घटनेतील निष्पाप 22 रुग्णांचा बळी व्यवस्थेने घेतला आहे. नाशिक शहराची कोरोना परिस्थितीचा आपण आढावा घेतला तर आपल्या सरळसरळ लक्षात येईल प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय काम करत आहेत.”

“नाशिकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही उपचारासाठी लागणारे कुठलेही इंजेक्शन उपलब्ध होत नाही. प्रशासन कुठलीही उपाययोजना आखायला तयार नाही. शहरातील नागरिकांमध्ये अतिशय भयावह स्थिती आहे. नागरिकांमध्ये व्यवस्थेविरोधात मोठी भिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत नाशिकमधील नगरसेवक आमदार आणि खासदार हे कुठेही जनतेसाठी काम करतांना दिसून येत नाही. हे लोकशाहीला शोभेल असं नाही,” असंही या पत्रात नमूद केलंय.

छात्रभारतीच्या प्रमुख मागण्या

  • झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करा
  • ऑक्सिजनची अभावी मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तातडीने प्रत्येकी 25 लाखाची मदत करा
  • नाशिकच्या मनपा आयुक्तांना तातडीने निलंबित करुन चौकशी करा
  • नाशिकमध्ये मुबलक असा सर्व इंजेक्शनचा तातडीने पुरवठा करा
  • नाशिकमध्ये निष्पाप बळी जात आहेत, तातडीने कोविड बेडची संख्या तातडीने वाढवा
  • प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी जनतेसाठी काम करावं, उपाययोजना आखाव्यात जणेकरुन परिस्थिती सावरता येईल

हेही वाचा :

Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, 22 जणांचा गुदमरुन मृत्यू, नेमकं काय घडलं?

नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी, महापौर आणि भाजपचे 3 आमदार फरार झाले काय? काँग्रेसचा सवाल

Nashik oxygen tank leak : आरोग्य व्यवस्थेवर ताण मान्य, पण…, राज ठाकरे कडाडले

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar demand suspension of Nashik Commissioner in Oxygen Tank Leak

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.