सरकारी कचेऱ्या होणार टकाटक; नाशिकमध्ये ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान सुरू

| Updated on: Oct 02, 2021 | 4:07 PM

नाशिक जिल्हात अस्वच्छ दिसणारी, फायलींवर धुळीचे थर जमलेले, कुठे छतातून पाण्याचे थेंब बाहेर येणारी, कुठल्या फायलीवर कोळ्याने जाळे केलेली सरकारी कार्यालये आता टकाटक होणार आहेत.

सरकारी कचेऱ्या होणार टकाटक; नाशिकमध्ये ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान सुरू
नाशिकमध्ये गांधी जयंतीचे औचित्य साधून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
Follow us on

नाशिकः जिल्हात अस्वच्छ दिसणारी, फायलींवर धुळीचे थर जमलेले, कुठे छतातून पाण्याचे थेंब बाहेर येणारी, कुठल्या फायलीवर कोळ्याने जाळे केलेली सरकारी कार्यालये आता टकाटक होणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान सुरू केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे सुंदर माझे कार्यालय या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दत्‍तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी रोहयो, नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी प्रशासन भीमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी नीलेश शृंगी , उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ,उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार नागरी जमीन कमाल मर्यादा शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार सर्वसाधारण राजश्री अहिरराव, तहसीलदार दीपक पाटील, तहसीलदार महसूल राजेंद्र नजन, तहसीलदार रचना पवार, यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचाही होणार फायदा

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमधील परिसर स्वच्छ असावा. येणाऱ्या नागरिकांना आणि कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनाही योग्य वातावरण कार्यालयात मिळावे याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. अभियानाच्या निमित्ताने अधिकारी कर्मचारी यांचे सेवाविषयक प्रश्न तसे बढती वेतन, बदली, गोपनीय अहवाल, सेवा पुस्तक, भविष्य निर्वाह निधी यासाठीही या वेळामध्ये मोहीम स्वरूपात काम होणार असल्याने कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच या वेळच्या निमित्ताने महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शासनाच्या वेगवेगळ्या सेवा सर्वसामान्य नागरिकांना सुलभतेने मिळण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे.

स्वच्छता अभियान राबवले

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यालयीन स्वच्छतेचे अभियान राबविले. यामध्ये कार्यालयांमधील सर्व विभागांमध्ये साफसफाई करण्यात आली. जुने मोडके फर्निचर निकामी कागदपत्रे इत्यादींची साफसफाई करण्यात आली.

इतर बातम्याः

ओ शेट, नाद कराच; स्वस्तातलं सोनं घ्यायची संधी हुकवू नका!

प्रभाग रचनेविरोधात मनसेची राज्यपालांकडे दाद; राज यांच्या आवाहनानंतर पक्ष आक्रमक, सोमवारी याचिका दाखल करणार

भुजबळांच्या नावे पुन्हा खणखणले धमकीचे फोन; जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा वापर
(Sanitation campaign will be implemented in government offices in Nashik, informed District Collector Suraj Mandhare)