AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओ शेट, नाद कराच; स्वस्तातलं सोनं घ्यायची संधी हुकवू नका!

नाशिकच्या सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 46600 नोंदवले गेले. सध्या सोन्याच्या दरात मंदी आहे. त्यामुळे ही संधी साधून गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

ओ शेट, नाद कराच; स्वस्तातलं सोनं घ्यायची संधी हुकवू नका!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 2:16 PM
Share

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 46600 नोंदवले गेले. सध्या सोन्याच्या दरात मंदी आहे. त्यामुळे ही संधी साधून गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

नाशिकच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46600 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61800 रुपये नोंदवले. मंगळवारी या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली नाही. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61000 रुपये होते. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 62500 रुपये नोंदवले गेले. गुरुवारी सोन्याच्या घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 500 रुपयांनी घसरून दहा ग्रॅममागे 46000 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर तब्बल एक हजाराने घसरून दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे तीन हजारांनी घसरून 59500 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी सोने आणि चांदीचे दर महागले. 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46700 नोंदवले गेले, 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44800, तर चांदीचे दर किलोमागे 61500 नोंदवले गेले. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 46600, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45200 नोंदवले गेले. चांदी किलोमागे 63500 होती.

किमती अफाट वाढणार

दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे. सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

दसऱ्याकडे डोळे सराफा व्यापाऱ्यांचे डोळे आता येणाऱ्या दसऱ्याकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.

नाशिकच्या सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 46600, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45200 नोंदवले गेले. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

प्राणवायूची चिंता नाही, नाशिकमध्ये 4 उद्योग; सिन्नर, अक्राळेमध्ये प्रकल्प उभारणी सुरू

नाशिकमध्ये मंगळवारी गोळाबाराची प्रात्यक्षिके; प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास नागरिकांना मनाई

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.