प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत शरद पवार बोलताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट; मोठं विधान काय?

या देशात 25 वर्षाच्या खालील जे तरुण आहेत. त्यातील 42 टक्के तरूण बेकार आहेत. बेकारीचा दर वाढत आहे. नियोजन विभागाने आकडे दिले आहेत. महागाईचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पेपरात मोदींनी गॅस स्वस्त केल्याचे फोटो येतात. 450 रुपयाचा सिलिंडर 1800 रुपयांवर गेला. हे दर परवडणारे नाही. डाळी, अन्नधान्य यातही तीच अवस्था आहे. देशाची अर्थव्यवस्था महत्त्वाची. मोदींनी सांगितलं ही अर्थव्यवस्था 5 लाख कोटी एवढी करू. पण माहिती घेतली तर 5 लाख कोटीच्या 50 टक्केही ही अर्थव्यवस्था पोहोचली नाही, असा शरद पवार यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत शरद पवार बोलताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट; मोठं विधान काय?
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 9:11 PM

शिर्डी | 4 जानेवारी 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मध्यंतरी मोदी बागेत भेट झाली होती. आंबेडकर यांनी आधी ही भेट झाल्याचा इन्कार केला होता. पण नंतर त्यांनी ही भेट झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांनीही या भेटीबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आंबेडकरांसोबत भेट झाल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आंबेडकर हे भाजप सरकारला घालण्यावर आग्रही आहेत, असं शरद पवार यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत कार्यकर्ता शिबीर पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. येत्या 15 दिवसात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. देशाला पर्याय कसा देता येईल, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे, असं सांगतानाच प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांच्याशी आमची चर्चा योग्य मार्गावर आहे. मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आग्रही आहेत. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीतील बैठकीवेळी प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घ्या म्हणून नेत्यांना सांगणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांनी ही घोषणा करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

तुम्ही तयार राहा

यावेळी शरद पवार यांनी इंडिया आघाडीसोबतच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. आपण एकटे लढणार नाही, सर्व सहकार्यांना सोबत घेऊन लढणार आहोत. जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळेल याची खात्री आहे. तुम्ही या कामाला तयार राहा, असे आदेशच पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.

ती मांडणी खोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशात पर्याय नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार म्हणत असतात. पवार यांच्या या विधानाचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. आमचे काही सहकारी म्हणतात बदल करायचा असेल तर एकच व्यक्ती आहे. ती म्हणजे मोदी. मोदींना पर्याय नाही. ही खोटी मांडणी आहे. मोदींना पर्याय नाही. ही गोष्ट खरी नाही, असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं.

त्या काही अर्थ नाही

तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार दाखवा, अशी विचारणाही आमच्याकडे होती. सत्ताधारी नेहमी म्हणतात, तुम्ही इंडिया म्हणून एकत्र होता. पण तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? इंडिया आघाडीच्या बैठकीत मी म्हटलं, तुम्ही चिंता करू नका. एमर्जन्सीमध्ये देशात निवडणुका झाल्या. तेव्हा त्यावेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. निवडणुकीनंतर जनता पक्षाचा जन्म झाला. त्यानंतर मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. म्हणून आजच उमेदवार जाहीर करा. तो नाही केला तर देश चालू शकत नाही, हा प्रचार खोटा आणि फसवा आहे. त्यामुळे मोदींना पर्याय नाही असं सांगितलं जातं त्यात काही अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तोपर्यंत गरीबी दूर होणार नाही

देशातील शेतकरी अन्नदाता आहे. त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. अवकाळी पावसामुळे त्याचं नुकसान झालं. शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढली. स्वातंत्र्याच्या काळात आपली लोकसंख्या 35 कोटी होती. त्यावर 70 ते 80 टक्के लोक अवलंबून होते. आज लोकसंख्या 114 कोटीच्या पुढे गेलो. आज 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजे लोकसंख्या अडीच ते तीन पट वाढली. लोकसंख्या वाढली, पण जमिनीचं क्षेत्रफळ वाढलं नाही. धरणं बांधली, शेतीची जमीन गेली, एमआयडीसी बांधल्या शेतीची जमीन गेली, शहरं बांधली शेतीची जमीन गेली.

विकासाचे जे कार्यक्रम असतील, त्यासाठी जमीन घ्यावी लागते. त्यामुळेही जमिनीचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. आम्ही सातत्याने सांगतो, शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी धोरणं आखा. त्याावर निर्णय घ्या. अन्य पर्याय घ्या. जोपर्यंत शेतीवरील बोजा कमी करत नाही, तोपर्यंत देशाची गरीबी दूर करू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.