सख्ख्या बहीण-भावाला वाचवण्यासाठी गुरुजींची तापीत उडी; भाऊ वाचला, पण बहीण बुडाली

| Updated on: Sep 13, 2021 | 6:25 PM

गणपती विसर्जनासाठी गेलेले सख्खे बहीण-भाऊ तापी नदीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी एका शिक्षकाने पाण्यात उडी घेतली. मात्र, यातील भावाला वाचवण्यात त्यांना यश आले. अनन्या मनीष यादव असे मृत मुलीचे नाव असून, ही घटना भुसावळ येथील झेडटीसी परिसरातील फेकरी स्मशानभूमीजवळील नदीकाठावर घडली.

सख्ख्या बहीण-भावाला वाचवण्यासाठी गुरुजींची तापीत उडी; भाऊ वाचला, पण बहीण बुडाली
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः गणपती विसर्जनासाठी गेलेले सख्खे बहीण-भाऊ तापी नदीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी एका शिक्षकाने पाण्यात उडी घेतली. मात्र, यातील भावाला वाचवण्यात त्यांना यश आले. अनन्या मनीष यादव असे मृत मुलीचे नाव असून, ही घटना भुसावळ येथील झेडटीसी परिसरातील फेकरी स्मशानभूमीजवळील नदीकाठावर घडली. या घटनेची पंचक्रोशीत दिवसभर चर्चा होती. (The teacher saved the child by jumping into the river, the child’s sister died)

गणपतीचे विसर्जन पाहण्यासाठी म्हणून अनन्या मनीष यादव (वय 10) आणि आर्यन यादव (वय 12) ही भावंडे तापी नदी काठावर रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास गेली होती. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी आरती सुरू झाली. यावेळी लहानग्या अनन्याचा नदीच्या काठावरून पाय घसरला. ती नदीत पडली. हे पाहता तिला वाचवण्यासाठी म्हणून बारा वर्षांच्या आर्यनने पुढे झेप घेतली. मात्र, त्याचा देखील पाय घसरला. त्यामुळे दोघेही नदीपात्रात पडले. नेमके याचवेळी संत गाडगे बाबा शाळेतील शिक्षक व अन्य काही पंधराएक भाविक गणपती विसर्जनसाठी जात होते. त्यातील विज्ञान विषयाचे शिक्षक एन. एन. पाचपांडे ( वय 57) यांनी ही घटना पाहिली. त्यांनी तात्काळ नदीपात्रात उडी मारली. त्यांना आर्यननला वाचवण्यात यश आले. मात्र, त्याची बहीण अनन्या वाहून गेली. सात तासांनंतर तिचा मृतदेह हाती लागला.

गुरुजींची समयसूचकता

संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाच्या गणेश विसर्जनापूर्वी त्यांची आरतीची तयारी सुरू होती. नेमकी याचवेळी एक रेल्वेगाडी पुलावरून जात होती. त्यावेळी गुरुजी पाचपांडे शुटींग करत असताना त्यांच्या कानावर वाचवा, वाचवा असे शब्द पडले. त्यांनी तात्काळ नदीत उडी मारली आणि आर्यनला वाचवले. त्याला काठावर आणले असता, त्याने माझी बहीणही नदीत पडल्याचे पाचपांडे यांना सांगितले. त्यांनी पुन्हा तात्काळ नदीत उडी घेतली. अनन्याचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.

पारोळ्यातील तरुण बुडाला

पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील तरुणाचाही गणपती विसर्जन करताना बुडून मृत्यू झाला. ही घटना सुरत येथे घडली. समाधान बापू ठाकरे (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. समाधान याचा मावस भाऊ विसर्जनासाठी गेला असता बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी समाधानने उडी मारली. मात्र, या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. (The teacher saved the child by jumping into the river, the child’s sister died)

संबंधित बातम्याः

Nashik is the best: लसीकरणाचा वारू चौखुर, अबब…25 लाख व्यक्तींनी घेतले डोस!

NashikGold: स्वस्त हो स्वस्त, सोने 100 तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त!

नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

नाशिक-पुणे आता पावणेदोन तासात, सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुसाट, 64 गावांतील मोजणी पूर्ण