NashikGold: स्वस्त हो स्वस्त, सोने 100 तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त!

नाशिकमध्ये (Nashik) सोमवारी (13 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर (Gold Rate) 100 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त होती. सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47500, तर चांदीचे दर किलोमागे 66200 रुपये नोंदवले गेले.

NashikGold: स्वस्त हो स्वस्त, सोने 100 तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 2:46 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) सोमवारी (13 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर (Gold Rate) 100 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त होती. सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47500, तर चांदीचे दर किलोमागे 66200 रुपये नोंदवले गेले. (Gold cheaper by Rs 100, silver cheaper by Rs 300)

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 होते. शनिवारी या दरातमध्ये कसलिही चढउतार झाली नाही. विशेष म्हणजे रविवारीही हेच दर होते. सोमवारी (13 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी स्वस्त होऊन 47500 होते. 22 कॅरेट सोन्याच्या दरात मात्र 200 रुपयांची वाढ होऊन ते 45000 रुपयांवर गेले. नाशिकमध्ये गुरुवारी चांदीचे किलोमागचे दर 65,800 होते. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी चांदीच्या दरात तेराशे रुपयांची वाढ झाली होती. रविवारी हेच दर कायम होते. मात्र, सोमवारी चांदीचे दर किलोमागे 300 रुपयांनी स्वस्त होत 66200 रुपयांवर स्थिरावले होते. सोने आणि चांदीच्या या दरावर अतिरिक्त जीएसटी असेल. दरम्यान आता आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून प्रतिकिलो चांदीचा दर 63,345 रुपये इतका आहे.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

सोने आणि चांदीच्या भावात किरकोळ चढउतार पाहायला मिळत आहे. नाशिकच्या सराफा बाजार पेठेत सोमवारी 47500 होते. 22 कॅरेट सोन्याचे दर 45000 रुपयांवर गेले. चांदीचे दर किलोमागे 66200 रुपये आहेत. – चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र (Gold cheaper by Rs 100, silver cheaper by Rs 300)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

नाशिक जिल्ह्यात 820 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, 3 लाख 97 हजार 268 ठणठणीत

Nashik weather:नाशिक जिल्ह्यात आज जोरदार, खान्देशमध्येही लावणार हजेरी

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.